google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशांकडे झुकला; वाहने अचानक पेट घेण्याच्या संख्येत झाली वाढ; नागरी संरक्षण महासंचालनालयाकडून हाय अलर्ट जारी

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशांकडे झुकला; वाहने अचानक पेट घेण्याच्या संख्येत झाली वाढ; नागरी संरक्षण महासंचालनालयाकडून हाय अलर्ट जारी

सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशांकडे झुकला;


वाहने अचानक पेट घेण्याच्या संख्येत झाली वाढ; नागरी संरक्षण महासंचालनालयाकडून हाय अलर्ट जारी

सोलापूरसह राज्यभरात उष्णतेची जणू लाट सुरु आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सोलापूरचे तापमान ४० अंशाच्यावर होते. 

आता तर ४४ अंशाची हद्द पार झाली आहे. गुरुवारी सोलापूरसह महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जाहीर केला आहे.

एकीकडे सूर्य आग ओकत आहे. सोलापूर शहराचे तापमान प्रचंड वाढले आहे. शुक्रवार, २ एप्रिल रोजी ४४.७ अंश इतक्या तापमान नोंद झाली आहे. सोलापूरच्या तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून सोलापूरची नोंद झाली आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुपारी १२ ते ४ यादरम्यान रस्ते निर्मनुष्य झाले आहे.

सोलापूरकरांच्या अंगाची होतेय लाही लाही होत असल्याचे दिसून येत आहे. नागरी संरक्षण महासंचालनालयाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागरिक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, दुपट्टे, गॉगल वापरत आहे. वाढलेल्या तापमानामुळे चारचाकी, दुचाकी गाड्या अचानक पेट घेत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.

पुढील काही दिवस उच्च तापमान राहणार असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Post a Comment

0 Comments