google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळात राज्यशासनाकडून हटकर समाज दुर्लक्षित.हटकर समाजाचे आम.डॉ.बाबासाहेब देशमुखाना निवेदन

Breaking News

मोठी बातमी..वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळात राज्यशासनाकडून हटकर समाज दुर्लक्षित.हटकर समाजाचे आम.डॉ.बाबासाहेब देशमुखाना निवेदन

मोठी बातमी..वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळात


राज्यशासनाकडून हटकर समाज दुर्लक्षित.हटकर समाजाचे आम.डॉ.बाबासाहेब देशमुखाना निवेदन

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 95034877812 )

सांगोला/प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील विद्यमान आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांना राजुरी, हटकर मंगेवाडी, जुजारपूर, वाणी चिंचाळे, महिम, डिसकळ, हंगिरगे, सोनंद, डोंगरगाव या गावातील हटकर समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले आहे की, शासनाने  वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या समितीवर हटकर समाजाचा प्रतिनिधी घेण्यात यावा.

 व हटकर समाज पदाधिकारी व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक बोलवावी . वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाबाबत हटकर समाजाचा प्रश्न विधानसभेत मांडावा अशी मागणी शिष्टमंडळानी केली.

सांगोला तालुक्यात हटकर समाजभवनास निधी प्रामुख्याने उपलब्ध करून द्यावा.पश्चिम महाराष्ट्रातील हटकर समाजाचे आराध्य दैवत असणारे क्षेत्र मल्लू देवी घोरपडी व निमज ता. कवठेमहांकाळ येथील मंदिरास भक्त निवास मंजूर करण्यात यावे.

 महाराष्ट्रात हटकर समाजाला उच्च शिक्षण, वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते, तसेच कृषी विभागाच्या महत्वपूर्ण योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ देऊन शासनाच्या मुख्य प्रवाहात समाजाला आणावे .अशा विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.

 यावेळी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी आपले विविध मागण्यांचे प्रश्न निश्चितपणाने मार्गी लावू असे आश्वासन दिले. याप्रसंगी निवेदन सादर करतान हटकर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 तसेच यावेळी तुकाराम भुसणर सर दत्तात्रय भुसणर, लक्ष्मण निळे, बाबुराव सोपे, अंकुश चौगुले, राणगर सर, नामदेव घुणे सह आदींनी आपले विचार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments