google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...शासकीय कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक...शासकीय कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की सांगोला तालुक्यातील घटना..

खळबळजनक...शासकीय कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की सांगोला तालुक्यातील घटना..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : महूद शहरात रोडलगत केलेली बेकायदेशीर अतिक्रमणे काढत असताना बीअर शॉपी चालकाने कारवाईला विरोध करीत 

पोलिसांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

त्याच्या बीअर शॉपीमधून विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला सुमारे २७, ८६६ किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता महूद (ता. सांगोला) येथे केली.

याप्रकरणी पोलिस नाईक अंकुश नलवडे यांनी बीअर शॉपी चालक अजय दादासो लवटे (रा. महूद) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३२, ३५१ (२, ३) महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सांगोला पोलिसांनी शनिवारी महूद शहरातील महूद आटपाडी व महूद सांगोला रोडवर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांसह दुकानासमोर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे फलक काढून घेण्याबाबत आवाहन करीत होते.

 पोलिस सांगोला रोडवरील दीपक बीअर शॉपीमधील इसमास बोलवून शॉपीच्या समोर बोर्ड हा रहदारीस अडथळा करीत आहे. तो तुम्ही काढून घ्या, असे सांगत होते. 

त्यावेळी सदर इसमाने मी कोण आहे हे माहीत नाही तुम्हाला, तुम्ही बोर्डाला हात तर लावून बघा, असे म्हणून तो पोलिसांच्या अंगावर धावून येत तुम्हाला बघतोच असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

पोलिसांनी बीअर शॉपीची पंचासमक्ष तपासणी केली असता, आतील खोलीमध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या दिसून आल्या. एकूण सुमारे २७,८६६ किमतीचा देशी-विदेशी दारूच्या २०७ बाटल्या (मद्यसाठा) ताब्यात घेऊन जप्त करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments