सांगोला ब्रेकिंग.. मोबाइलचे थकलेले हप्ते भरण्याच्या कारणावरून
एकास चार्ज करण्याच्या वायरने व कुन्हाडीच्या दांड्याने गळ्यावर, डाव्या पायाच्या नडगीवर, दोन्ही हातांवर मारहाण
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : मोबाइलचे राहिलेले हप्ते भरत
का नाहीस, अशी विचारणा करीत रागाच्या भरात नात्यातील तरुणाने शिवीगाळ व दमदाटी करून मोबाइल चार्ज करण्याच्या वायरने गळ्यावर
त्याचप्रमाणे कुन्हाडीच्या दांड्याने गळ्यावर, डाव्या पायाच्या नडगीवर, दोन्ही हातांवर जबर मारहाण करून तरुणास जखमी केले.
ही घटना शुक्रवार, दि.२ मे रोजी सायंकाळी ०५:०० वाजेच्या सुमारास महीम, ता. सांगोला येथे घडली. याबाबत, काशीलिंग पांडुरंग कारंडे
(रा. कारंडेवाडी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी योगेश हनुमंत नारनवर (रा. महीम, ता. सांगोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत, फिर्यादी यांच्या नात्यातील योगेश नारनवर यास सहा महिन्यांपूर्वी फिर्यादीच्या नावावर मोबाइल घेऊन दिला होता. त्याचे हप्ते भरून तो मोबाइल तोच वापरत होता. दरम्यान, शुक्रवारी, दि.२ मे रोजी सायंकाळी ०५:०० वाजेच्या सुमारास
महीम गावातील अण्णा गोरवे यांच्या घरासमोर फिर्यादीने योगेश यास मोबाइलचे हप्ते राहिले आहेत, ते भर असे म्हणाला असता योगेशने मी हप्ते भरत नाही, तुझा मोबाइल घेऊन जा, असे म्हणाला.
त्यावेळी फिर्यादी तेथून मोबाइल घेऊन जात असताना योगेश याने त्यास शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादीने त्यास तू मला शिव्या देऊ नको,
असे म्हणाला असता त्याने मोबाइल चार्ज करण्याच्या वायरने गळ्यावर मारहाण केली व त्याच्या हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने
फिर्यादीच्या पायाच्या नडगीवर, दोन्ही हातांवर मारून जखमी करून तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments