राज्यात पहिल्या तीन सोसायटीमध्ये समावेश असणाऱ्या जवळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सुनील आबा साळुंखे बिनविरोध
१९४६ पासून सलग ७९ वर्षे सोसायटीवर साळुंखे पाटलांची सत्ता
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / तालुका प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात आघाडीवर असलेल्या पहिल्या तीन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये समावेश असणाऱ्या जवळा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
यांचे निकटवर्तीय असणारे सुनील आबा साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जवळा ता सांगोला येथे सोमवार दि ५ मे रोजी येथील संस्थेच्या कार्यालयात या निवडी पार पडल्या.
जवळा येथील विविध कार्यकारी संस्था राज्यातील अत्यंत नामांकित सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते.
१९४६ पासून सलग ७९ वर्षे या संस्थेवर पूर्वी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व नंतर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे.
स्थापनेपासून सातत्याने ही संस्था अ वर्गात आहे. संस्थेचे उलाढाल कोट्यावधी रुपयांची असून १००% कर्ज वसुली हे या संस्थेचे खास वैशिष्ट्य आहे. या सहकारी संस्थेचे स्वतःची दोन मजली सुसज्ज इमारत आहे.
तसेच ३ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तसेच ही संस्था सभासद शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात सोने तरण कर्ज उपलब्ध करून देते. विशेष म्हणजे सोनेतारण कर्जाची सेवा सभासदांना २४ तास उपलब्ध असते.
ही सेवा महाराष्ट्रात एकमेव जवळा सोसायटीच्या सभासदांनाच मिळते हे विशेष. सभासद शेतकऱ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून या सोसायटीच्या वतीने पिग्मीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
जवळा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी चेअरमन मानसिंग साळुंखे यांनी राजीनामा दिल्याने चेअरमनपद रिक्त झाले होते. चेअरमन पदासाठी सुनील आबा रावसाहेब साळुंखे
यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी सुनील आबा साळुंखे यांची नियुक्ती होताच त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नेते अरुणभाऊ घुले, पंडितकाका साळुंखे, माजी सरपंच दत्ता बर्वे, सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलिफा, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुतार, वैभव देशमुख यांच्यासह संस्थेचे संचालक तानाजी आगलावे,
सखाराम कोरे, नशीर तांबोळी, प्रशांत शिवाजी साळुंखे, युवराज घुले, गिरीश साळे, रामचंद्र आगलावे, माजी चेअरमन मानसिंग साळुंखे, लक्ष्मी तरंगे व सखुबाई खांडेकर आदींसह संस्थेचे संचालक, सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट ;
स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांचे विशेष लक्ष असणाऱ्या जवळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मला स्वर्गीय काकांच्या आशीर्वादाने
आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली. राज्यातील अत्यंत नामांकित असणाऱ्या या सहकारी सोसायटीचे कामकाज करत
असताना या संस्थेच्या दैदीप्यमान परंपरेला कुठेही छेद बसणार नाही याची काळजी घेऊ आणि माजी आमदार दिपक आबांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा लौकिक आणखी वाढवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू ;
सुनील आबा रावसाहेब साळुंखे
नूतन चेअरमन, जवळा विकास सोसायटी
0 Comments