google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक बातमी! काळ्या हळदीला परदेशामध्ये जादा दराचे आमिष दाखवून मंगळवेढ्यातील शेतकरी नेत्याला ९ लाखांचा गंडा; तिघा विरुद्ध गुन्हा दाखल औ

Breaking News

खळबळजनक बातमी! काळ्या हळदीला परदेशामध्ये जादा दराचे आमिष दाखवून मंगळवेढ्यातील शेतकरी नेत्याला ९ लाखांचा गंडा; तिघा विरुद्ध गुन्हा दाखल औ

खळबळजनक बातमी! काळ्या हळदीला परदेशामध्ये जादा दराचे आमिष दाखवून मंगळवेढ्यातील शेतकरी नेत्याला ९ लाखांचा गंडा; तिघा विरुद्ध गुन्हा दाखल 


मंगळवेढा:- काळया हळदीची परदेशात खूप महाग विक्री होत असल्याने त्यात गुंतवणूक केल्यास करोडो रुपयांमध्ये फायदा मिळेल 

असे आश्वासन एका शेतकरी संघटनेच्या नेत्याला देवून त्यांचेकडून वेळोवेळी ९ लाख रुपये घेवून विश्वास बसावा म्हणून करारपत्र तयार करून व्यवहार पूर्ण न करता

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्दारकेश उर्फ दादा सुर्यवंशी (रा.माने गल्ली, मंगळवेढा), गुरुशरण चौहान (रा.अंधेरी मुंबई), मुकेश अग्रवाल उर्फ करण परसावत 

या तीघांविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश जगन्नाथ पवार (वय ७१, रा. सिध्दापूर) हे शेतकरी संघटनेचे काम करीत असल्यामुळे येताळा भगत, सिध्देश्वर भगत, दिलीपकुमार धनवे यांना ते मागील २५ वर्षापासून ओळखत आहेत.

दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी यातील फिर्यादी पुणे येथे असताना दिलीपकुमार धनवे यांचा पहाटे ४.०० वा. फिर्यादीस फोन आला व तुम्ही कोठे आहात असे विचारून आपणास मुंबईला जायचे आहे असे सांगून गाडीत बसल्यावर काय काम आहे 

ते सांगतो. सकाळी ९.०० वा. दिलीपकुमार धनवे व येताळा भगत हे डेक्कन पुणे येथे भेटले. त्यांनी आरोपी व्दारकेश उर्फ दादा सुर्यवंशी यांच्याकडे काळी हळद आहे.

सदर हळदीला मार्केटमध्ये खूप रेट आहे. मुंबई येथील अंधेरीमध्ये गुरुशरण चौहान हा हळदीचा व्यापारी व एजंट असून तेथे आपणास जावयाचे आहे 

तेथे गेल्यावर आरोपीनी फिर्यादीस काळी हळद परदेशात पाच हजार कोटी रुपयांना विक्री होत असल्याचे सांगितले.

त्यासाठी टेस्टमध्ये बसल्यास प्रति किलो ३०० कोटी रुपये दर भेटेल. टेस्ट करण्यासाठी १ कोटी ३० लाखाचे कोरियन कंपनीचे किट विकत घ्यावे जास्ती लागते. 

या हळदीमध्ये प्रमाणात रेडीएशन असतात. त्यामुळे माणसाची हाडे व रक्त जळते. त्याचा परिणाम शरीरावर होतो. ही टेस्ट करण्यासाठी कंपनीचा चेकर आणावा लागतो.

यावेळी फिर्यादीने आमचेकडे एवढे पैसे नाहीत असे सांगितले असता आमचेकडे तुम्ही ५१ लाख रुपये जमा करा, बाकीचे आम्ही भरतो असे आरोपीने सांगितले. दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी

 येताळा भगत व दादा सुर्यवंशी यांचे करारपत्र झाले. दि. २० मार्च २०२२ रोजी दिलीपकुमार धनवे व फिर्यादी व्दारकेश उर्फ दादा सुर्यवंशी यांच्या वडदेगाव येथील शेतामध्ये गेलो.

तेथे आरोपीने हळदीच्या काही टेस्ट करून दाखवून विश्वास संपादन केला. किट घेण्यासाठी ठरलेल्या रकमेबाबत बोलणी करण्यासाठी सिध्देश्वर भगत, दिलीपकुमार धनवे,

 मंगळवेढा पंचायत समितीचे कृषी अधिकारी विनायक तवटे, दादा सुर्यवंशी असे आम्ही एस.एम. कंन्स्ट्रक्शन बाणेर रोड, पुणे येथील ऑफिसमध्ये गेलो.

किट खरेदी करण्यासाठी आणलेले फिर्यादीकडील ७लाख ५० हजार रुपये, विनायक तवटे यांचेकडील २० लाख रुपये, येताळा भगत यांचेकडील १० लाख ५० हजार रुपये असे एकूण ३८ लाख रुपये दादा सुर्यवंशी यांचेकडे दिले.

वरील आरोपींनी दि. १९ फेब्रुवारी २०२२ ते ४ सप्टेबर २०२२ दरम्यान काळया हळदीस परदेशात खूप किंमत असल्याचे सांगून ९ लाख रुपये घेवून आर्थिक फसवणूक केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments