पालक वर्गातून खळबळजनक चिंता! मंगळवेढ्यात गळफास घेण्याची तरुणांची मालिका संपता संपेना;
१९ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणाने केली आत्महत्या
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे एका १९ वर्षीय मुलाने अज्ञात कारणावरुन शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून उमेश राजेंद्र वाघमारे असे त्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे. गेली तीन दिवस मंगळवेढ्यात तरूणांची गळफास घेण्याची मालिका सुरु असून आत्तापर्यंत तीन दिवसात तीघांनी गळफास घेतला आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी, यातील खबर देणारे राजेंद्र मच्छिंद्र वाघमारे (रा. बोराळे) हे दि.२० रोजी मोहोळ येथे नातेवाईकाचे लग्न असल्याने गेले होते.
सायंकाळी ४ वाजता लग्नामध्ये खबर देणाऱ्याचा भाऊ संजय मच्छिंद्र वाघमारे यांनी फोन करुन सांगितले की, तुझा मुलगा उमेश राजेंद्र वाघमारे याने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला आहे.
मुलाच्या वडिलाने सायंकाळी ५ वाजता येवून पाहिले असता मयत हा झाडाला लटकलेला दिसला त्यानंतर मयतास खाली उतरवून उपचारासाठी मंगळवेढा
ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलीस करीत आहेत.
दरम्यान सोमवार दि.१९ मे रोजी मंगळवेढा शहरात एका ४५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. दि.२० रोजी बोराळे येथे १९ वर्षीय
तर बठाण येथे २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. या सलग दोन युवक व एका तरुणीने आत्महत्या केल्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे.
0 Comments