google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीसांची कामगिरी अवैध्य जनावरे वाहतुक करणाऱ्या ६ आरोपीतांविरुध्द गुन्हे दाखल करुन ३ वाहनासह ३२ लहान मोठी जनावरे घेतली ताब्यात

Breaking News

सांगोला पोलीसांची कामगिरी अवैध्य जनावरे वाहतुक करणाऱ्या ६ आरोपीतांविरुध्द गुन्हे दाखल करुन ३ वाहनासह ३२ लहान मोठी जनावरे घेतली ताब्यात

सांगोला पोलीसांची कामगिरी अवैध्य जनावरे वाहतुक करणाऱ्या ६ आरोपीतांविरुध्द गुन्हे


दाखल करुन ३ वाहनासह ३२ लहान मोठी जनावरे घेतली ताब्यात

दिनांक १७/०५/२०२५, दिनांक १९/०५/२०२५, दिनांक २१/०५/२०२५ रोजी पोनि विनोद घुगे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणेकडील पोसई माहुरकर, पोसई हिप्परकर पोहेकॉ/१५९६ घुले, पोना / १८०६ व्यवहरे, 

पोकॉ/१८११ कुलकर्णी, पोकॉ/८५७ देसाई, पोका / २८ भोई पोकों ८६० नदाफ, पोकों ६२६ कांबळे असे अवैध्य धंद्यावर कारवाई करणे करीता पेट्रोलींग करीत असताना गोपयीन बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,

 सांगोला पोलीस ठाणे हद्दीत अवैध्य जनावरे वाहतुक करीत आहे. त्या अनुशंगाने कारवाई करणे करीता पोनि विर्नाद घुले यांनी पोलीस ठाणेकडील वरील पथकाना पाटवुन देवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले होते.

 त्याप्रमाणे वरील पथकानी दिनांक १७/०५/२०२५ रोजी रात्री १०/०० वा. वे सुमारास मौजे वाकी घेरडी ता सांगोला येथे आरोपी नामे १) सचिन कांबळे रा. वाकि घेरडी ता. सांगोला व चालक २) रंगनाथ लक्ष्मण सकट 

रा. खुपसंगी ता. मंगळवेढा असे महिंद्रा बुलेरो पिकअप गाडी नं MH ०३CD ०५१३ व दिनांक १९/०५/२०२५ रोजी दुपारी १४/१५ वाचे सुमारास सांगोला गावचे शिवारात सांगोला ते सोलापूर जाणारे

 रोडवर पंढरपूर ब्रिज जवळ आरोपी नामे १) शरद धोंडिराम लाटने वय ५३ रा. धनगर मळा कोरोची ता. हातकलगणे जि. कोल्हापूर याचे ताब्यातील आयशर टॅम्पो नंबर एमएच ५१ सी ०६३९ तसेच

 दिनांक २१ /०५/२०२५ रोजी रात्री ११/०५ वा. चे सुमारास आलेगाव ते वाकीचेरडी जाणारे रोडवरती माळेवाडी येथे दोन अज्ञात इसम यांनी एक अशोक लेलंड कंपनीचे चारचाकी वाहन नं MH ११-CH-७४३६ असे मिळुन 

आल्याने या वाहनात कोणत्याही प्रकारचा पशु वाहतुकीचा बोर्ड न लावता आरटीओच्या परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारचे अधिकृत पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र नसल्याचे माहीत

 असतानासुध्दा जर्शी गाई, लहान खोंडे व म्हैशीचे एक रेडकु अशी जनावरे दाटीवाटीने कोंडुन त्यांना नर्दयतेने वागणुक देवुन चारा पाणी व औषध पाण्याची सोय न करता कत्तलीकरत्ता घेवुन जात असल्याचे

मिळुन आले आहेत. सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. ४१८/२०२५, ४३४/२०२५, ४३८/२०२५ प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधि १९६०-११ (१), ११(१) (A), ११(१) (F),११ (१) (H), 

११ (१) (1).११ (१) (४), पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम १ व९ व पशु वाहतुक अधिनियम ४७ (अ) (ब) (क) ४८ ४९ (अ),५०,५६ (क) गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई केली आहे..

सदरची कामगिरी मा.श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. श्री प्रितम यावलकर सो, अपर पोलीस अधिक्षक सो, सोलापुर ग्रामीण मा. श्री विक्रांत गायकवाड 

सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, मंगळवेढा, यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक विनोंद घुगे सांगोला पोलीस ठाणे यांचे 

आदेशान्वंये पोसई विनायक माहूरकर, पोसई हणमंत हिप्परकर पोहेकों घुले, पोना व्यवहरे, पोकों कुलकर्णी, पोकों देसाई, पोकों भोई पोकों नदाफ, पोकों कांबळे यांनी सदरची कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments