google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वाचुन‌ आणी नाचुन साजरी केली जाते---भाई चंद्रकांत सरतापे

Breaking News

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वाचुन‌ आणी नाचुन साजरी केली जाते---भाई चंद्रकांत सरतापे

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वाचुन‌ आणी नाचुन  साजरी केली जाते---भाई चंद्रकांत सरतापे


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

विश्वरत्न पं.पु.डाॅ‌ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती‌ महोत्सव संपुर्ण भारतभर  मोठ्या थाटामाटात साजरा   होत आसुन..भिमाचे अनुयायी भिम जयंती साजरी करण्यासाठी  प्रत्येक गावोगावी एकत्रीत येऊन काम करताना  दिसत आहेत.

  भिम जयंती जवळ आली की विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही  नाचुन नाही तर वाचुन साजरी करावी.. असे मेसेज विविध समाज माध्यमावरती पहावयास मिळतात,

वाचायला मिळतात..खरे तर  हा विचार अगदी बरोबरच आहे.परंतु भिमाचे अनुयायी हे गावोगावी भिम जयंती साजरी करत असताना फक्त नाचुन नाही तर वाचुन ही भिम जयंती साजरी करत असतात..

भिम जयंती ही फक्त एक दिवस साजरी करायची नसते हे भिम अनुयांना माहीत आहे.भिमाचे अनुयायी  रोजच्या रोज विविध माध्यमातुन भिम जयंती ३६४ दिवस  साजरी करत आसतात..

जयंतीची मिरवणुक मात्र वर्षातुन १ दिवस नाचुन काढत असतात ही वस्तुस्थिती आहे. आणी ज्या गाण्यावर नाचतात ना ति ती गाणी सुध्दा तथागत गौतम  बुध्दांच्या व भिमरायांच्या विचारांवर व कार्यावर आधारीत

 असतात.आशा गाण्यातुन भिमरायांचे कार्य घरोघरी पोचत आसते.अहो कित्येक पुस्तके वाचुन ज्या गोष्टी लक्षात येत नाहीत कळत नाहीत त्या एका गाण्याच्या माध्यमातुन  लक्षात येतात व‌ सहज समजतात हे मात्र निश्चित खरे आहे.

भिम जयंती‌ फक्त नाचु असते असे नाही.. कित्येक‌ ठिकाणी भिम जयंतीचे औचीत्य साधुन आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबीरासारखे उपक्रम राबवले जातात तसेच वेगवेगळे सांस्कृतीक कार्यक्रम राबवले जात आसतात.जयंती आली की फक्त नाचले जाते  आसे नाही.

    कित्येक भिमनगर मध्ये वाचनालये आहेत.तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी 

 कायमस्वरुपी अभ्यासिका चालवल्या जातात.काही ठिकाणी व्यायाम शाळा आहेत.काही ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळले जातात.फक्त नाचले जाते आसे नाही.

 आशा‌ कित्येक उपक्रमातुन‌ भिमरायाचे विचार,आचार प्रत्येकापर्यंत पोचावे हाच हेतु भिम अनुयायांचा आसतो. हे काम रोजच्या रोज भिम अनुयायांकडुन  होत असते.

विश्वरत्न पं.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी‌ आंम्हा भारतीयांना बहुमोल आसे संविधान देऊन माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार दिला.त्या संविधानाचे पालन करणे ,त्यावरती निष्ठा ठेवणे

 हे  सुध्दा  भिम जयंती वाचुन साजरी  करण्यासारखेच आहे. आशा प्रकारे भिमाचे अनुयायी रोजच्या रोज संविधाना प्रती निष्ठा राखुन आहेत‌. ही निष्ठा सुध्दा भिम जयंती साजरी करण्यामध्ये येते.

  डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आंम्हाला बुध्द दिला बुध्दांचा धंम्म दिला आंम्हाला  वंदना,पंचशीला ,त्रीशरण दिले‌ या मुळे तर आंम्हाला बुध्द जयंती व भिम जयंती रोजच्या रोज नाचुन नाही तर वाचुन करायचे भाग्य मिळाले आहे.

भिम-बुध्दांच्या  विचारांचा प्रचार व‌ प्रसार व अनुकरण भिम अनुया़यी  रोजच्या जिवन शैलीत व  समाजामध्ये वावरताना  काटेकोरपणे करीत आसतात.भिम अनुयायांच्या कुटुंबांमध्ये बारसे , वाढदिवस‌ ,  साक्षगंध (साखरपुडा) मंगल परीणय (शुभ विवाह)सोहळा होतो 

तेथे ही आमची बुध्द वंदना,पंचशील,त्रिशरण  गृहण केले जाते...भिम अनुमाने  घर बांधले तर त्या गृहप्रवेशावेळी सुध्दा आमची हिच वंदना गृहण केली जाते हे काहीच नाही एखाद्या व्यक्तीचे  दुःखद‌ निधन झाले तरी बुध्द वंदना म्हटली जाते.

म्हणजे आमच्या कुटुंबात रोजच्या रोज कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बुध्दांच्या व भिमरायांच्या  विचारांचे अनुकरण ,प्रचार व प्रसार केला जातो. आंम्ही उगीचच रोज नाचत बसत नाही तर आमचा बांधव भिमरायांच्या विचाराचा

 प्रचार व प्रसार वेगवेगळ्या माध्यमातुन रोज करीत असतो.. भिम जयंती साजरी करणे म्हणजे भिमरायांचे विचार समाजामध्ये रुजवणे मग कारण कोणते का असेना. अहो आमच्या चिमुकल्या बाळाला सुध्दा आंम्ही रोजच्या जिवनात 

 "जय भिम " बाळा असंच  बोलुन आंबेडकर त्या बाळाच्या डोक्यात घालत आसतो.भिमराव आंबेडकर डोक्यात घालण्याचे काम आमचे भिम अनुयायी रोजच विविध माध्यमातुन व विविध उपक्रमातुन करत असतात.एखादा व्यक्ती 

भेटला तरी आंम्ही  "जय भिम " म्हणतो ते फक्त जयंती आली म्हणुन नाही तर रोजच्या रोज‌ " जय भिम " च्या माध्यमातुन भिमरायांचे नाव घेऊन भिमरायांचे  कार्य डोळ्यासमोर ठेवले जाते. हे काम भिम बांधवाकडुन‌ नित्याने सुरु असते.

राहीला विषय शिक्षणाचा आमच्या पिढ्यान-पिढ्या अशीक्षीत ठेवल्या गेल्या.शिक्षणाची मक्तेदारी विशिष्ठ‌ समाजाकडे  होती.त्यामुळे आमचा व  शिक्षणाचा कसलाच संमंध न्हवता.कित्येक वर्षांनी शिक्षणाची दारे आमच्या साठी खुली झाली आहेत. 

एवढ्या उशिरा शिक्षणाच्या संधी मिळाल्या तरी  आमचे  बांधव वकील, डाॅक्टर ,इंजीनियर प्राध्यापक झाले आहेत तर काही बांधव शिक्षणाच्या जोरावर अती उच्च स्थानावरती विराजमान झाले आहेत.

वेगळया राजकीय पदावरती व अनेक  व्यवसायीक क्षेत्रामद्ये सुध्दा आमचे बांधव अग्रेसर आहेत..म्हणुन भिम अनुयायी  ३६४ दिवस भिम जयंती‌ वाचुन साजरी करतात. तर फक्त १ दिवस भिम जयंती नाचुन साजरी करतात.नाचण्यामागे बाबासाहेबाप्रती स्वाभिमान 

,जिव्हाळा आस्था असल्याने बाबासाहेबामुळेच आपण आहोत याची जाणीव असल्याने भिम अनुयायी  बेभान होऊन एक दिवस नाचुन भिम जयंती  साजरी करतात हे समजुन घेतले पाहीजे ....

Post a Comment

0 Comments