google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील सीसीटीव्ही कॅमेरे पळविले चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेच पळविल्यामुळे तालुक्यात खळबळ

Breaking News

सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील सीसीटीव्ही कॅमेरे पळविले चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेच पळविल्यामुळे तालुक्यात खळबळ

सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील सीसीटीव्ही कॅमेरे पळविले


चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेच पळविल्यामुळे तालुक्यात खळबळ

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- शाळेच्या प्रांगणात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले असल्याची घटना

 बामणी ता. सांगोला येथे घडली. याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणीचे मुख्याध्यापक यांनी 

सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे. दोनच महिन्यापूर्वी बसविण्यात आलेले कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी पळविल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच आता शाळेच्या सुरक्षितेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बामणी ता. सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी शाळेच्या प्रांगणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. 

त्या कॅमेराच्या वायरा तोडून अज्ञात चोरट्याने ७ कॅमेरे चोरुन नेले असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी अर्जात नमूद करण्यात आली आहे.

शाळांमध्ये एकाचवेळी शेकडो विद्यार्थी असतात.

अशा परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे प्रत्येकवेळी लक्ष देणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत शासनाकडून जिल्हा परिषद शाळेत मुलांच्या सुरक्षिततेकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. 

मात्र, चोरट्यांनी वायरा तोडून अज्ञात चोरट्याने ७ कॅमेरे चोरुन नेले असून सीसीटीव्ही कॅमेरेच्या चोरीच्या या प्रकारामुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments