विजेच्या
खांबावरील धोकादायक विद्युत तारा भूमिगत करा – शाहरुख मुलाणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला. ( प्रतिनिधी ) – विजेच्या खांबावरील धोकादायक विद्युत तारा भूमिगत करा अशी मागणी रुग्ण हक्क परिषद
मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी एमएसईबी कनिष्ट अभियंता रामदास घोडके यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.
यावेळी मुलाणी म्हणाले की, सांगोला पंढरपूर रोड वरील एच. पी. गावडे पेट्रोल पंप च्या मागे, रेल्वे रुळाच्या पश्चिमेला तसेच सांगोला बायपास च्या पश्चिमेला नरुटे जानकर वस्ती येथील सर्व्हे क्र. 544 येथे 02 उच्च व्होल्टेज च्या
विद्युत तारा असून ज्या मधून साधारण 07 ते 08 गावांना वीज पुरवठा केला जातो. अशा या तारा आमच्या घराच्या गच्चीच्या साधारण 04 ते 05 फुटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारण, वस्तुस्थिती मागील दोन महिन्यापूर्वी सोसायट्यांच्या वाऱ्यांमुळे विद्युत तारांमध्ये सतत घर्षण होऊन चिंगारी उडून घराच्या अवतीभवती असलेले गवत जळून खाक झाले आहे.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यात अधिक गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्याअर्थी सांगोला बायपासला या विद्युत तारा आडव्या येत असल्यामुळे त्या ब्रिजच्या दरम्यान भूमिगत करण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे उक्त विद्युत तारा देखील भूमिगत करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने तात्काळ या विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी संबंधितांना आदेश असे पत्र ईमेल द्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या सहित महावितरण अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता पंढरपूर, उप कार्यकारी अभियंता,
कनिष्ट अभियंता सांगोला यांना पाठवले असून प्रत्यक्ष भेट घेऊन देखील निवेदन देऊन जोरदार मागणी केली आहे. याप्रसंगी भारतीय लष्कर सेवा माजी सैनिक उद्धव पाटील, महेश कुराडे, बापूसो भंडगे गुरुजी उपस्थित होते.
तसेच, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनात विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, आपत्ती सौम्यीकरण अशा प्रकारची योजना सक्रीय केलेली
असून अंदाजे 5000 कोटी रुपयांचा हा कार्यक्रम आहे. याची कामे टप्याटप्प्याने केली जाणार आहेत. त्याअनुषंगाने उक्त काम देखील करण्यात यावे अशी मागणी मुलाणी यांनी केली.
दरम्यान कनिष्ठ अभियंता रामदास घोडके म्हणाले की, तात्काळ सकारात्मक प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्यात येईल आणि त्याच्या योग्य पाठपुरावा देखील केला जाईल.
0 Comments