सांगोला खळबळजनक बातमी.. आई-वडिलांना वारंवार शिवीगाळ, रागातून धाकट्या भावाने
मोठ्या भावाच्या पोटात चाकूसारख्या धारदार हत्याराने भोसकून केला खून
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- मद्यप्राशन करून आई-वडिलांना वारंवार शिवीगाळ करीत असल्याचा रागातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या पोटात चाकूसारख्या धारदार हत्याराने भोसकून खून केला.
ही घटना बुधवार १६ एप्रिल रोजी सकाळी १०:४० च्या सुमारास चिंचोली, ता. सांगोला येथे घडली. कार्तिक नामदेव यादव (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपीस सांगोला पोलिसांनी अवघ्या अडीच तासातच पंढरपूर येथे ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.
याबाबत, वडील नामदेव रावसाहेब यादव (रा. चिंचोली) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी तुषार नामदेव यादव (वय २३ रा. चिंचोली, ता. सांगोला) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी याचा मोठा मुलगा मृत कार्तिक हा कोलकाता येथे कामास आहे. धाकटा मुलगा तुषार शेती करतो. दरम्यान चैत्री यात्रेनिमित्त कार्तिक हा गावी आला होता. त्यास दारू पिण्याचे व्यसन होते.
दरम्यान, कार्तिक हा दारूच्या नशेत आपल्या आई-वडिलांना शिवीगाळ करीत असल्याने धाकटा भाऊ त्याच्यावर चिडून होता. दरम्यान, बुधवारी सकाळी ११:४० च्या सुमारास दोघा भावांमध्ये भांडण झाले.
एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मोठा भाऊ कार्तिक घराकडे जात असताना आरोपी लहान भावाने चाकूसारख्या धारदार हत्याराने कार्तिकला भोसकून खून केला.
0 Comments