google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...मुलांनी खेळायचं कुठे कारण शाळेला क्रीडांगण नाही.. सांगोलामधल्या शाळेची दुरवस्था

Breaking News

खळबळजनक...मुलांनी खेळायचं कुठे कारण शाळेला क्रीडांगण नाही.. सांगोलामधल्या शाळेची दुरवस्था

खळबळजनक...मुलांनी खेळायचं कुठे कारण शाळेला क्रीडांगण नाही.. सांगोलामधल्या शाळेची दुरवस्था


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : शालेय जीवनाचा काळ अविस्मरणीय असतो. पण आजही काही गावांमधल्या शाळाची अवस्था दयनीय आहे. सोलापुरातल्या सांगोलामधल्या महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाची इमारत याचं एक उदाहरण आहे..

मुलांनी शाळेत जाऊन कसं शिकायचं?? साध्या सोयीसुविधाही शाळेत नाहीत.

मुलं शाळेत गेली त्यांच्या पालकांच्याच मनाला धास्ती लागून राहते. इतकी दयनीय अवस्था या शालेय इमारतीची दिसत आहे. शाळेची दुरूस्ती करा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

 मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांच्या तक्रारी फेटाळल्या आहेत. इमारत सुस्थितीत आहे, असा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे.

सांगोला तालुक्यात शाळेची दुरवस्था पाहून इमारत धोकादायक, स्वच्छतागृहही नाही अशा अवस्थेत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ चालला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

ही आवडते मज मनापासुनी शाळा

लाविते लळा ही जसा माऊली बाळा...

अरेरे, पण हे काय... ही शाळा पाहिलीत.. सोलापुरातल्या सांगोला मधल्या किडे बिसरी इथलं हे महात्मा फुले माध्यमिक विद्यालय... 

तुटलेल्या खिडक्या, काचाही फुटलेल्या... भिंतींना गेलेले तडे पाहून इथल्या विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागण्याऐवजी मनात भीती बसली असेल..

शाळेची दुरवस्था पाहून पालकांना धास्ती लागलेली असते की, मुलं शाळेत सुरक्षित आहेत ना. ही शाळा 100 टक्के अनुदानित असूनही शाळेत मुलं-मुली, शिक्षक असूनही शौचालय नाही. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

 आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता, इमारत पडकी, खिडक्या निखळलेल्या, काचाही फुटक्या एवढंच नव्हे तर मुलांनी खेळायचं कुठे कारण शाळेला क्रीडांगण नाही..

विद्येच्या मंदिराची अवस्था इतकी बिकट असेल तर शाळेतल्या इतर कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय... यात सुधारणा झाली नाही तर येत्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग आणखी खडतर होईल.. तेव्हा लक्ष द्या...

Post a Comment

0 Comments