ब्रेकिंग न्यूज...सांगोल्यात वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- सांगोला येथील जयलिला हॉटेल शेजारी असणारे माऊली हॉटेल मिरज सांगोला रोडवर 06 एप्रिल 2025 रोजी सकाळी 06.45 वाजणेचे सुमारास घडली.
हयगयीने अविचाराने निष्काळजीपणाने भरधाव वेगात वाहन चालवुन मोकळ्या जागेत बसलेले वारकऱ्यास जोराची दिल्याने वारकऱ्याचा धडक देऊन गंभीर रित्या जखमी होऊन मृत्यू झाला
अपघातामध्ये बंडु गोपाळा जाधव (वय 65 वर्षे रा. करडयाळ ता. कागल ,जि. कोल्हापुर) या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघाताची फिर्याद राजेंद्र रामा जाधव ( रा. करड्याळ ता. कागल, जि. कोल्हापुर) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 30 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता चैत्रवारी निमित्त पंढरपुर येथे करड्याळ गावातील
श्री.विठठल रखुमाई पायी दिंडी भक्त मंडळ, करड्याळ गणेशवाडी असे संयोजकाने आयोजित केलेल्या पायी दिडींतुन फिर्यादी मी पत्नी व चुलते बंडु गोपाळा जाधव असे मिळुन गावातील एकुण 36 लोक पायी निघाले होते.
ठरले प्रमाणे मुक्काम करत करत काल रविवार दिनांक 06 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6.45 वाजणेचे सुमारास सांगोला येथील जयलिला हॉटेल शेजारी असणारे माऊली हॉटेल मिरज सांगोला रोड च्या बाजुला वारकरी चहा पाण्यासाठी थांबले असताना
त्यावेळी दिंडीतील बंडु गोपाळा जाधव, फिर्यादी स्वतः व इतर वारकरी लोक चहा पिवुन रोडच्या डाव्या बाजुला असलेला हॉटेलच्या बाजुला असलेल्या मोकळया जागेत बसले होतो.
त्यावेळी अचानक एका भरधाव पांढ-या रंगाच्या कारगाडीने रोडच्या साईडपटटीवर येवुन दिंडीतील वारकरी बंडू गोपाळा जाधव यांना धडक देवुन न थांबता पुढे निघुन गेली. त्यावेळी मागुन कारगाडीचा नंबर पाहिला असता त्याचा नंबर MH-10-DV-2272 होता.
त्यानंतर फिर्यादी स्वतः व सोबत वारकरी रमेश वाणी, आनंदा जाधव, शिवाजी जाधव यांनी मिळुन हॉटेल मालकाने दिलेल्या वाहनातुन बंडु जाधव यांना उपचार करिता सांगोला येथील ग्रामीण रूग्णालय मध्ये घेवुन आलो.
तेथील डॉक्टरांनी बंडु गोपाळा जाधव यांना तपासुन ते उपचारपुर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले त्यानंतर फिर्यादी यांना सांगोला पोलीस स्टेशन मध्ये बोलाविण्यात आले व बंडु जाधव यांना धडक देणारे वाहन दाखविण्यात आले.
ती कारगाडी फिर्यादी यांनी ओळखली असून त्या टाटा डिगारो कंपनीची पांढ-या रंगाची ( MH-10-DV-2272) याच कारगाडीने चुलते बंडु जाधव यांना धडक देवुन निघुन गेली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


0 Comments