google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक! एसटी महामंडळाचा अजब कारभार, झुरळानं खाल्ली एसटी कंडक्टरची नोकरी; नेमकं काय आहे प्रकरण?

Breaking News

खळबळजनक! एसटी महामंडळाचा अजब कारभार, झुरळानं खाल्ली एसटी कंडक्टरची नोकरी; नेमकं काय आहे प्रकरण?

खळबळजनक! एसटी महामंडळाचा अजब कारभार,


झुरळानं खाल्ली एसटी कंडक्टरची नोकरी; नेमकं काय आहे प्रकरण? 

एसटी महामंडळाच्या अजब कारभार समोर आला आहे. एसटी बसमध्ये झुरळं फिरत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

 न्यूज 18 लोकमतनं ती बातमी दाखवली होती. आता हा व्हिडिओ वाहकानंच दिल्याचा ठपका ठेवत एसटी मंडळानं वाहकाचं निलंबन केलंय.

प्रवाशांच्या अंगावर फिरणाऱ्या झुरळांचा बंदोबस्त करण्याऐवजी एसटीनं वाहकावर केलेल्या कारवाईनं चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला आहे.

बसमधून प्रवास करताना नागरिकांना झुरळामुळे हा प्रवास त्रासदायक ठरत होता.एसटीच्या ताफ्यामधील अनेक बसमध्ये झुरळे फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आला.

बसमध्ये या झुरळांचा आसन व प्रवाशांचा अंगावर मुक्त वावर असल्याचा व्हिडीओमध्ये पहायला मिळलाच काही ठराविक बसमध्ये झुरळांचा प्रादूर्भाव झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

चोराच्या उलट्या बोंबा

चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार एसटी महामंडळानं केलाय आहे. .एसटी बसमध्ये झुरळं फिरत असल्याची बातमी समोर आली बसमध्ये पेस्ट कंट्रोल करण्याऐवजी 

एसटीने वाहकाने व्हिडिओ दिल्याचं म्हणत त्याचे थेट निलंब केले आहे. संतोष शिंदे असे निलंबन केलेल्या वाहकाचे नाव आहे . एसटीचे निर्जंतुकीकरण राहिले बाजूला कर्मचाऱ्यांचे निलंबन केले.

उपाययोजना करण्याची मागणी

या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या बस हटवून नव्या आणि सुरक्षित बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

 प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments