google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन

Breaking News

शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन

शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन


(शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी)-सांगोला शहर व परिसरातील विविध मागण्यांचे निवेदन शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने

 जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सांगोला दौऱ्यात  देण्यात आले. सांगोला शहरातील ट्रामा केअर सेंटरची इमारत तयार असून सुद्धा डॉक्टरांच्या सेवेअभावी बंद अवस्थेत आहे.

 त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यातील अनेक रूग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे सांगोला शहरातील ट्रामा केअर सेंटर त्वरीत सुरू करावे. तसेच सांगोला पंढरपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असून

 अनेक अपघात वारंवार घडत आहेत. प्रवासी नागरीकांच्या सुरक्षतेखातर हा रस्ता चौपदीकरण करण्यात यावा. तसेच सांगोले तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विहिरीतील पाण्याची पातळी कमी होत

 असून पाण्या अभावी जळू लागलेल्या बागांना दुष्काळी अनुदान त्वरीत मिळावे,  शेतकऱ्यांचे विविध योजनांचे थकीत अनुदान त्वरीत मिळावे. सांगोल्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून अशा परिस्थितीमध्ये सांगोले तालुक्यामध्ये एकच पोलीस स्टेशन असून अपुऱ्या

 पोलीस कर्मचाऱ्यावर हे पोलीस स्टेशन चालू असून जवळा, जुनोनी आणि महूद या ठिकाणी सब पोलीस स्टेशन व्हावे कारण सांगोला शहर व तालुक्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. म्हणून ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत.

 तसेच सांगोला महूद रेल्वे गेट या गेटवर रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून त्यात क्रॉसींग असल्यास नागरीकांना भर उन्हात ताटकळत उभे रहावे लागते. म्हणून त्या गेटवर लवकरात लवकर उड्डाण पूल करणेत यावा. या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

संस्थेचे अध्यक्ष अच्युत फुले, रमेश फुले, मा. नगरसेवक शिवाजी बनकर आदींनी हे निवेदन पालकमंत्र्यांना भेटून दिले.

.        आमची संस्था गेली ५ वर्षे शहर व तालुक्यामध्ये सातत्याने नागरीकांच्या प्रश्नावर सामाजिक काम करीत असून वरील मागणी सुध्दा सांगोला शहरातील नागरीकांच्या आग्रहाखातर आपणास विनंतीपूर्वक निवेदन देवून करणेत येत आहे. 

वरील प्रश्नी आपण त्वरीत लक्ष घालावे व सांगोला शहराच्या दृष्टीने आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments