ब्रेकिंग न्यूज..सांगोला येथे व्याजाच्या वसुलीसाठी खाजगी सावकाराने केली मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल
सांगोला येथील तानाजी बाळू खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण अंबादास कोळेकर, अंबादास धुळा कोळेकर, विकास उर्फ अक्षय रामेश्वर कोळेकर, मसुदेव रामहरी देशमुख सर्व रा. बेंदवस्ती अचकदाणी यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेंदवस्ती अचकदाणी ता. सांगोला येथील फिर्यादी तानाजी बाळू खरात यांच्या वडिलांना २०२० मध्ये यांना घरामध्ये आर्थिक अडचण असल्याने त्यांनी गावातील ओळखीचे व्याजाने पैसे देणारे लक्ष्मण अंबादास कोळेकर रा. बेंदवस्ती अचकदानी ता. सांगोला यांची भेट घेऊन
साडेतीन लाख रुपयाची गरज असल्याचे सांगितले होते. त्यावेळी लक्ष्मण कोळेकर यांनी पैसे देण्यास तयार आहे, परंतु पैशाच्याम बदल्यात काहीतरी तारण ठेवावे लागेल, असे सांगितले.
फिर्यादीचे वडील बाळू खरात व मामा लहानू खरात असे दोघेजण लक्ष्मण कोळेकर यांचेकडे जावून अचकदाणी बेंदवस्ती गावातील ५० गुंठे जमीन तारण ठेवण्यास तयार असून साडेतीन लाख रुपयाची गरज असल्याचे सांगितले.
त्यावेळी लक्ष्मण कोळेकर यांनी शेतजमीन खुशखरेदी करुन घेऊन दरमहा ३% व्याजाने साडेतीन लाख रुपये दिले. मुद्दल परत दिल्यानंतर खुशखरेदी दिलेली शेतजमीन परत फिर्यादीच्या वडीलांच्या नावे करण्याचे ठरले.
डिसेंबर २०२४ मध्ये फिर्यादी व त्यांची आई लता असे लक्ष्मण कोळेकर यांचेकडे जावून त्यांना ठरल्याप्रमाणे व्याज व मुद्दल असे मिळून ८ लाख रुपये परत करण्यास तयार असून वडिलांनी तारण ठेवलेली शेतजमीन परत करण्यास सांगितले.
त्यावेळी लक्ष्मण कोळेकर यांनी तुम्हाला तुमची शेतजमीन परत पाहीजे असेल तर साडेतीन लाख रुपयांचे व्याज व मुद्दल मिळून १४ लाख रुपये होत असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी तानाजी बाळू खरात यांनी आतापर्यंत २ लाख रुपये व्याजाची रक्कम दिली
असून तुम्हाला ६ लाख रुपये देतो तुम्ही आमची शेत जमीन परत माझ्या वडीलांना फिरवून द्या असे लक्ष्मण कोळेकर यांना सांगितले. यावर यांनी तु लई शहाणा झाला आहे असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
0 Comments