google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..वडिलांवर केला मुलाने कुऱ्हाडीने हल्ला; सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..वडिलांवर केला मुलाने कुऱ्हाडीने हल्ला; सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

ब्रेकिंग न्यूज..वडिलांवर केला मुलाने कुऱ्हाडीने हल्ला; सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- करांडेवाडी (ता. सांगोला) येथे मुलाने वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. 

याप्रकरणी वडील गणपती भोजलिंग गळवे (वय ५२) यांनी मुलाविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गणपती भोजलिंग गळवे (रा. करांडेवाडी, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणपती गळवे पत्नीशी मोठा मुलगा नवनाथ चुकीच्या मार्गाला लागल्याबद्दल चर्चा करत होते. 

यावेळी फिर्यादीचा मुलगा नवनाथने हातात कुऱ्हाड घेऊन घरासमोर येत, वडिलांना माझी बदनामी का करतो, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर कुऱ्हाडीच्या दांड्याने वडिलांच्या पाठीवर,

 हातावर व मांडीवर मारहाण केली. पुन्हा बदनामी केल्यास जीवे मारण्याची धमकीही मुलाने वडिलांना दिली. 

त्यांच्या आरडाओरडीनंतर लहान भाऊ भागुजी गळवे यांनी घटनास्थळी धाव घेत नवनाथला रोखले. 

या हल्ल्यात जखमी झाल्याने गणपती गळवे यांनी सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध वडिलांनी तक्रार नोंदवली.

Post a Comment

0 Comments