google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महात्मा फुले जयंतीनिमित्त लक्ष्मी दहिवडीतील खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन लक्ष्मी दहिवडीकरांचे व सांगोला करांचे अतुट नाते-आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

Breaking News

महात्मा फुले जयंतीनिमित्त लक्ष्मी दहिवडीतील खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन लक्ष्मी दहिवडीकरांचे व सांगोला करांचे अतुट नाते-आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

महात्मा फुले जयंतीनिमित्त लक्ष्मी दहिवडीतील खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे डॉ. बाबासाहेब देशमुख


यांच्या हस्ते उद्घाटन लक्ष्मी दहिवडीकरांचे व सांगोला करांचे अतुट नाते-आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मंगळवेढा:- लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

महात्मा फुले युवा मंचच्या वतीने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा शाल, फेटा, हार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यादरम्यान उद्योजक आबासाहेब बंडगर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळेस उपस्थित जनसमुदायास संबोधित करताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणले, सांगोला व लक्ष्मी दहिवडीतील जनतेचे स्व. आबासाहेब असल्या पासूनचे अतुट नाते आहे.

 गावातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांला आर्थिक अडचण असेल तर मी स्वतः आर्थिक मदत करेन असा शब्द यादरम्यान डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.

याशिवाय सद्या कॅन्सर सारखे आजार फावलत आहेत. आपल्या शेतात जैविक पद्धतीने शेती करून त्यातुन विमुक्त पालेभाज्या आहार घेणे आवश्यक

 असून प्रत्येकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केले.

यादरम्यान विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा शाल, फेटा व सन्मानपत्र देऊन आमदार देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्रा. बाळासाहेब बनसोडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल टाकळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महात्मा फुले युवा मंचचे अध्यक्ष अनिल बनसोडे यांनी मानले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments