ब्रेकिंग न्यूज..म्हैशाळचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांचा
मनमानी कारभार शेतकऱ्यांने तात्काळ अर्ज देऊन ही अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे झाले मोठे नुकसान
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
प्रतिनिधी (शशिकांत कोळी): मौजे पारे मोटे वस्ती येथील म्हैशाळ कालवा योजनेतील मायनेरी कालवा क्रमांक 1(2 नंबर आउटलेट वॉल)मधून येणारी
काळी 8 इंची पाईपलाईन ही निकृष्ट दर्जाची वापरल्यामुळे. बाळू पडळकर ते अप्रुफा नदी. मध्यंतर मोटे वस्ती येथील शेतकरी भाऊसो बाबा मोटे यांच्या शेतामध्ये पाईपलाईन गळती झाली
दिनांक 20 मार्च 2025. रोजी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी गट क्रमांक112/4. या शेतामध्ये कोहिनूर जातीचे खरबूज दीड एकर इतके क्षेत्रात पाणी शिरून तोडणीसाठी आलेले खरबूज फळ पिकाचे अतोनात नुकसान झाले.
अंदाजे 30टन फळ पिक वाया गेले. असून 9 ते 10 लाख रुपये एवढ्या किमतीचे खरबूज पिकाचे नुकसान झाले आहे. दिनांक 20 मार्च 2025 ते दिनांक24 मार्च 2025 पर्यंत पूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेले.
वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ कळवून देखील त्यांनी पाणी बंद करण्यास विलंब केला. त्यामुळे फळपीक पूर्ण उध्वस्त झाले. म्हैसाळ कालवा उपविभाग क्रमांक1
सांगोला. सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना अर्ज देऊनही या शेतकऱ्यास कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही व त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
जर का या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही तरी उपोषणास बसण्याचा तेथील शेतकरी व ग्रामस्थ हे विचाराधीन आहेत.
0 Comments