धक्कादायक ! विवाह जुळून येत नसल्याने नैराश्यातून पदवीधर तरुणाची आत्महत्या;
पुण्यात राहून करत होता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास
सांगोला :- विवाह जुळून येत नाही म्हणून नैराश्यातून सुशिक्षित तरुणाने राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना काल रविवार दि. १३ रोजी सकाळी ११ च्या सुमारास कमलापूर ता. सांगोला येथे घडली. सिद्धेश्वर बाळासो वाघमोडे (वय ३०, रा. कमलापूर, सांगोला) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सिद्धेश्वर वाघमोडे याचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असून, घरची परिस्थिती हलाख्याची आहे, आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
सिद्धेश्वर हा पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता. दरम्यान, आठवड्यापूर्वी त्याच्या आजोबांचे निधन झाल्याने तो गावी कमलापूरला आला होता. त्यातच त्याच्या लग्नाचा योग जुळून येत नसल्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता.
काल रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे आई-वडील मोलमजुरीच्या कामावर गेले होते. जेवणाचा डबा घेऊन आलेल्या महिलेने हाक मारली.
परंतु, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही दरवाज्याच्या फटीतून आत डोकावले असता सिद्धेश्वर याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता.
0 Comments