google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोल्यात कोसळले.... हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन केंद्राचे टेलिस्कोप आणि पॅराशुट कोणतीही जिवीतहानी नाही; कारचे नुकसान

Breaking News

खळबळजनक..सांगोल्यात कोसळले.... हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन केंद्राचे टेलिस्कोप आणि पॅराशुट कोणतीही जिवीतहानी नाही; कारचे नुकसान

खळबळजनक..सांगोल्यात कोसळले.... हैदराबाद येथील टाटा मूलभूत


संशोधन केंद्राचे टेलिस्कोप आणि पॅराशुट कोणतीही जिवीतहानी नाही; कारचे नुकसान

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- हैदराबाद येथून खगोलशास्त्र अभ्यासासाठी शुक्रवार दि.29 मार्च रोजी रात्री सोडण्यात आलेला टेलिस्कोप आणि पॅराशुट शनिवार दि.30 मार्च रोजी सकाळच्या सुमारास हवेच्या दाबामुळे भरकटून 

सांगोला शहरातील खडतरे गल्लीत कोसळले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी एका कारचे नुकसान झाले आहे. टेलिस्कोप व पॅराशुट कोसळल्याचे समजताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

शुक्रवार दि.29 मार्च रोजी रात्री हैदराबाद येथून एक टन वजनाचा टेलिस्कोप आणि यंत्रणा व अर्धा टन वजनाचे दोन पॅराशुट सोडण्यात आले होते. ही यंत्रणा अवकाशात जवळपास 32 किलोमीटर उंचीवरून निरीक्षणे नोंदवत होती.

 रात्री उशिरा ही निरीक्षणे नोंदविण्याचे काम संपल्यावर ही यंत्रणा हैदराबादच्या परिसरातच उतरणे अपेक्षित असताना हवेच्या प्रेशरमुळे आंध्रप्रदेश ओलांडून महाराष्ट्रातील सांगोला शहरात कोसळली.

यातील पहिले पॅराशुट हे सांगोला शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असणार्‍या खारवटवाडी येथे पडले, तर टेलिस्कोप आणि पॅराशुट ही यंत्रणा सांगोला शहरातील खडतरे गल्लीत कोसळली.

 शनिवार दि.30 मार्च रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याने कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी एक कारचे नुकसान झाले आहे. ही यंत्रणा भरकटल्याचे टाटा संशोधन केंद्राला

 समजल्यानंतर त्यांची टीम शोधत सांगोल्यापर्यंत पोहचली. अचानक आलेल्या हवेच्या प्रेशर मुळेच ही यंत्रणा भरकटली आणि इतक्या लांब वर येऊन कोसळल्याचा दावा टाटा संशोधन केंद्राचे सतीश पुजारी यांनी केला.

1 टेलिस्कोप आणि पॅराशुट ही यंत्रणा खडतरे गल्लीत कोसळली.

2 सांगोला शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर खारवटवाडी येथे कोसळले पॅराशुट

3 कारचे नुकसान

हे सुद्धा वाचा

Post a Comment

0 Comments