धक्कादायक...सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे मध्यरात्री कपाटातील दागिन्यांची चोरी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
आजकाल चोरीचे प्रमाण खूप वाढत आहे. सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे अज्ञांत चोरट्याने घरात घुसून करून कपाटातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने असा सुमारे ५२ हजार रुपये किमतीचा
मुद्देमाल चोरी केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास इंगोले वस्ती येथे घडली. फिर्यादी प्रमोद गोरख इंगोले हे शुक्रवार, २८ रोजी रात्री ११ वा. च्या सुमारास झोपी गेले.
वडील अंगणात झोपले होते. तर मोठा भाऊ प्रवीण हाँलमध्ये झोपला होता. त्यावेळी त्याने घराचे दार उघडे ठेवले होते. शनिवार, २९ रोजी रात्री एकच्या सुमारास घरातील कपाट वाजल्याने प्रमोद इंगोले यांना जाग आली,
त्यावेळी उठुन पाहिले असता घरातून एक अज्ञात माणूस पळत बाहेर गेला. प्रमोद ने त्याचा पाठलाग गेला असता तो अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला.
नंतर प्रमोद इंगोले यांनी घरात येऊन घरातील लोकांना घडलेली घटना सांगितले. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने पाहिले असता, ८ हजार रूपये किंमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील
झुबे, ७ हजार रुपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, ७ हजार रुपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याची बाळी व ३० हजार रुपये किंमतीचे १ तोळ्याचे सोन्याचे गंठण असे ५२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कपाटात दिसून आले नाहीत.
इंगोले यांनी दागिन्यांचा घरात शोध घेतला परंतु दागिने मिळून आले नाहीत. यावरुन कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत हे निदर्शनास आले. तसेच शेजारी राहणारे प्रकाश अर्जुन इंगोले यांच्या घरातही चोरी झाल्याचे समजले आहे.
0 Comments