मोठी बातमी..शहाजीबापू पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचा पक्ष नक्कीच विचार करेल ; युवासेना सचिव ऋतुराज क्षीरसागर
सांगोला येथे युवासेनेचा युवा विजय कार्यक्रम संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी शहाजीबापू पाटील यांनी सुमारे चार ते पाच हजार कोटींचा विकास निधी आणला आहे. एवढा निधी आणूनही शहाजीबापूंचा दुर्दैवाने पराभव झाला.
शहाजीबापूंचा पराभव शिवसेना पक्षाच्या अत्यंत जिव्हारी लागला असून पक्ष त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा नक्कीच विचार करेल असा विश्वास युवा सेनेचे सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या युवासेनेच्या “युवा विजय महाराष्ट्र दौरा” या कार्यक्रमांतर्गत सांगोला येथील माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात
शिवसैनिक आणि युवा सैनिकांना संबोधित करत असताना ते बोलत होते. यावेळी युवासेनेचे संपर्कप्रमुख सागर पाटील, कार्यकारणी सदस्य शिवाजीराव जाधव,
सुनील खुर्द, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, युवासेनेचे दीपक खटकाळे, समीर पाटील, जगदीश पाटील, अभिजीत नलावडे, अजिंक्यराणा शिंदे यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, शिवसेना उपनेते माजी शहाजीबापू पाटील हे पक्षातील अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदार नेते आहेत.
शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून तो एक परिवार आहे. या परिवारातील सदस्य नेहमीच एकमेकांना आधार देण्याचे काम करतात.
शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांना निष्ठेने साथ दिली त्यांचा पक्ष नक्कीच विचार करेल. त्यामुळे शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी निश्चित रहावे.
शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यात पक्षाचे लोकप्रिय नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले त्याबद्दल आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
यापुढे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेऊन शिवसेना आणि युवा सेनेचा झंझावात घरोघरी पोहोचवावा आणि गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या सूत्रानुसार पुन्हा एकदा
सांगोला विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आजपासूनच कामाला लागावे असे आवाहन ह शेवटी ऋतुराज क्षीरसागर यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
0 Comments