खळबळजनक...लाडकी बहीण योजनेचे पैसे उडवले दारूवर, बायकोने विचारताच पतीने कोयत्याने केला हल्ला
महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि त्यांची क्रयशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये दिले जातात.
पण, हे पैसे खरंच महिलांना खर्च करता येतात का? अशा शंकाही उपस्थित होतात. या शंकांना वाव देणारी घटना समोर आली आहे.
पत्नीच्या खात्यावर जमा झालेले योजनेचे पैसे पतीने दारूवर उडवले आणि त्याबद्दल विचारणा करताच पत्नीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात घडली आहे.
माढा तालुक्यातील लोणी गावात ही घटना घडली आहे. एका महिलेच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले होते. त्याने खात्यात आलेले पैसे परस्परच काढून घेतले.
आणि त्यानंतर ते पैसे दारू पिण्यात उडवले. हे पत्नीला कळलं. तिने पतीला पैसे का खर्च केले, याबद्दल विचारणा केली. त्यानंतर पतीने पत्नीला मारहाण केली. इतकंच नाही. तर कोयत्याने हल्ला केला.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महिलेने पतीबरोबरच सासूवरही आरोप केला आहे. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला.
0 Comments