google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायत चोपडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वाटप कार्यक्रम संपन्न

Breaking News

ग्रामपंचायत चोपडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वाटप कार्यक्रम संपन्न

ग्रामपंचायत चोपडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वाटप कार्यक्रम संपन्न


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला /प्रतिनिधी--  ग्रामपंचायत चोपडी येथे प्रधानमंत्री आवास योजना सन 2024/ 25 टप्पा क्रमांक 2 ग्रामीण घरकुल लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप व पुणे येथे 

या संदर्भात आयोजित केलेल्या केंद्रीय मंत्री मा.अमित शहा भारत सरकार यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर

 मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रम शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी चोपडी येथे संपन्न झाला .

ग्रामपंचायत चोपडी येथे 50  घरकुल लाभार्थ्यांना आमंत्रित करून सर्वप्रथम त्यांचे स्वागत करण्यात आले .

यावेळी चोपडी ग्रामपंचायत अधिकारी एम. व्ही. मिसाळ यांनी सदर घरकुलाच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल  उपस्थित लाभार्थी यांना माहिती दिली. पालक अधिकारी श्रीमती देशमुख मॅडम यांची उपस्थिती होती.

यावेळी या कार्यक्रमासाठी  सरपंच सौ. मंगलताई सरगर, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन भिकाजी बाबर, चेअरमन दगडू बाबर, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर बाबर,

 कृषी मित्र बाळासाहेब बाबर , श्रीमंत सरगर, ग्रामपंचायत सदस्य,  गावातील आजी-माजी पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक , घरकुल लाभार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments