आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांचे आज सांगोल्यात आगमन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधी ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार ना.रामदासजी आठवले
आज रविवार दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली-सोलापूर-बीड दौर्यावर येत असून सांगोला तालुक्यामध्ये त्यांचे आगमन आटपाडी मार्गे दुपारी 2 वाजता महूद बु येथे होणार आहे.
त्यांच्या स्वागतासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी महूद येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाइं सांगोला तालुकाध्यक्ष खंडूतात्या सातपुते यांनी केले आहे.
0 Comments