खळबळजनक...सांगोला तालुक्यातील जवळा येथील घटना वेल्डिंगचे काम करताना पडल्याने तरुणाचा मृत्यू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)तालुका प्रतिनिधी
सांगोला :- हॉटेलचे वेल्डिंग काम करताना तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत झाल्याची घटना बुधवारी
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जवळा (ता. सांगोला) येथे घडली. रीहान फारूक शेख (वय १९, रा. शास्त्रीनगर, सोलापूर) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
वशीम अब्दुलरहीमान शिकलकर (रा. भगतसिंग चौक, शास्त्रीनगर, सोलापूर) यांनी दिलेल्या खबरीनुसार ते वरील ठिकाणी वेल्डिंगचे काम करतात. बुधवार, २० रोजी ते स्वतः मोहम्मद हुसेन खैरदी व रिहान फारूख
शेख असे वेल्डिंगचे काम करण्याकरिता प्रमोद पंडित साळुंखे (रा. जवळा ता. सांगोला) यांच्या जवळा चौकातील हॉटेलचे वेल्डिंग काम करण्यासाठी आले होते.
दरम्यान सायं. साडेसहाच्या सुमारास पत्रा शेडचे वेल्डिंग करताना रिहान शेख याचा लोखंडी पाईप वरून तोल गेल्याने तो वरून खाली पडला.
त्यांच्या डोक्यास मार लागल्याने उपस्थितांनी जखमी अवस्थेत त्यास उपचारासाठी सांगोला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले.
0 Comments