सांगोला तालुक्यातील दुर्दैवी घटना..दुचाकीची बैलगाडीला धडक; बैल व दुचाकीवरील दोन जण जागीच ठार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)तालुका प्रतिनिधी
सांगोला :- भरधाव दुचाकीने बैलगाडीस धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार तर बैलही जागीच मृत पावल्याची घटना शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील
सांगोला-मंगळवेढा बायपास रोडवरील हॉटेल श्रीराम जवळ घडली आहे. नंदकुमार सी चौधरी (वय २७), अभिजित दादा भोसले (वय २८, दोघेही रा. पापरी, ता. मोहोळ) अशी अपघातातील मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
धायटी (ता. शांगोला) येथील बैलगाडी मालक शेतकरी हा उद्या रविवारी बाजार असल्यामुळे आपले बैल विकायला सांगोला येथील आठवडा बाजारात घेऊन निघाला होता.
युनिकॉर्न दुचाकीवरून (एम एच १३-जी ५३६५) दोन जण हायवे वरून जात असताना वळणाऱ्या बैलगाडीला जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील नंदकुमार चौधरी
व अभिजित भोसले हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले तर बैलगाडी हाकणाऱ्या शेतकऱ्याचा एक बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
0 Comments