google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात खळबळजनक..मृत व्यक्तीच्या ठिकाणी तोतया व्यक्ती उभा करून नोंदविला खरेदी दस्त

Breaking News

सांगोल्यात खळबळजनक..मृत व्यक्तीच्या ठिकाणी तोतया व्यक्ती उभा करून नोंदविला खरेदी दस्त

सांगोल्यात खळबळजनक..मृत व्यक्तीच्या ठिकाणी तोतया व्यक्ती उभा करून नोंदविला खरेदी दस्त


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- मृत व्यक्तीच्या ठिकाणी तोतया व्यक्ती उभा करून बोगस खरेदी खत तयार केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक यांच्या फिर्यादीनुसार सांगोला येथील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

ही घटना सोमवारी घडली आहे. दुय्यम निबंधक कार्यालय सांगोला अपर्णा गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैयाज अब्दुल कुरेशी

 (रा. सांगोला) यांनी वाढेगाव (ता. सांगोला) येथील जमीन गट नंबर ८१७ या मिळकतीबाबत तोतया व्यक्ती उमा करून खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी दस्त केला असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

 त्या अनुषंगाने फिर्यादी अपर्णा गुरव यांनी अर्जदार, गैर अर्जदार व संबंधित घेणार, देणार आदी लोकांना २ ऑगस्ट २४ रोजी नोटीस काढून त्यांचे म्हणणे देण्यास सांगितले होते. अर्जदार फैयाज कुरेशी यांनी यातील खरेदी 

• दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

खत लिहून देणार अब्दुल हमीद ऊर्फ हाजी हमिद हुसेन खाटीक हे १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबई येथे मृत पावले असतानाही लिहून घेणार राजू सिकंदर सव्वालाखे हेलो (रा. सांगोला) याने लिहून देणार

 यांच्या ठिकाणी तोतया व्यक्ती उभा करून २९ मे २०२३ रोजी बनावट व बेकायदेशीर दस्त अस्तित्वात आणला असे म्हणणे दिले होते. 

त्यासोबत अब्दुल हमीद ऊर्फ हाजी महंमद हुसेन खाटीक यांचा मृत्यूचा दाखलाही सोबत जोडला असल्याचे तपासाअंती दिसून आले आहे. त्यामुळे दस्त तोतया व्यक्ती उभा करून नोंदवला असल्याचे आढळून आले आहे.

 याबाबत फिर्यादी अपर्णा गुरव यांनी राजू सिकंदर सव्वालाखे व तोतया व्यक्ती लिहून देणार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

Post a Comment

0 Comments