google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महामाता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या १७१ व्या जयंतीदिनानिमित्त सांगोला शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे या दिवशी होणार आगमन

Breaking News

महामाता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या १७१ व्या जयंतीदिनानिमित्त सांगोला शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे या दिवशी होणार आगमन

महामाता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या १७१ व्या जयंतीदिनानिमित्त


सांगोला शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे या दिवशी होणार आगमन

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी महामाता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या 171 व्या जयंती दिनानिमित्त शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी

 विश्‍वरत्न विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सांगोला शहरात आगमन होणार असल्याची माहिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली.

या पुतळ्याच्या आगमनाप्रित्यर्थ 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता महामाता भिमाई यांची व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची रॅली सांगोला शहरातील भीमनगर येथील दीक्षाभूमी कट्टा येथून निघणार असून भारत गल्ली, जय भवानी चौक, 

जुनी भाजी मंडई वेशीतून मारुती मंदिर, मणेरी गल्ली, परीट गल्ली, महादेव गल्ली, कोष्टी गल्ली, भोपळे रोड ते महात्मा फुले चौक या मार्गाने रॅली काढण्यात येणार आहे. महात्मा फुले चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत

 अभिवादन करून नेहरू चौक येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत

 पुढे सांगोला नगरपरिषदेसमोरून जुनी पोलीस चौकी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कचेरी रोड मार्गे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे ही रॅली येणार आहे. 

तरी या रॅलीमध्ये शिव-फुले-शाहू-आंबेडकर अनुयायी सांगोला शहर व तालुक्यातील बहुजन समाज बंधू भगिनी भीम अनुयायी यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सांगोला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील भव्य स्मारकामधील चबुतर्‍यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. 

दुपारी 3 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे धम्मविधी करण्यात येणार आहे. हा धम्मविधी कोल्हापूरचे भंतो संबेधी व गुगुवाड ता. जत, जि. सांगली येथील भंतो गोविंदो मानदो हे करणार आहेत.

सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभ हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ रजिस्टर कार्यकारिणीचे अध्यक्ष तानाजी श्रीरंग बनसोडे, खजिनदार सितारामआबा विश्‍वनाथ बनसोडे, सेक्रेटरी बाळासाहेब संदीपान बनसोडे, उपाध्यक्ष अप्सरा सोमनाथ ठोकळे,

 उपाध्यक्ष मैना प्रशांत बनसोडे, सहसचिव रुपेश जगन्नाथ बनसोडे, संचालिका विजयाताई बाबासो बनसोडे, संचालक दीपक मनोहर बनसोडे, रामस्वरूप दगडू बनसोडे, सतीश पोपट बनसोडे,

 कुंदन फुलचंद बनसोडे, जगदीश यशवंत भरकडे, किशोर बाबुराव बनसोडे, सोपान आप्पा बनसोडे, मिलिंद रेवन बनसोडे, प्रशांत बबन धनवजीर, सुभाष धोंडीराम बनसोडे, महादेव वसंत बनसोडे, उमेश शंकर बनसोडे, मोहन हिराप्पा गुडदौरू धम्म मित्र बापूसाहेब चंदू ठोकळे, 

तज्ञ संचालक अ‍ॅड. आनंदा जगन्नाथ बनसोडे, तज्ञ संचालक अ‍ॅड. सागर अंबादास बनसोडे आदींसह समस्त बहुजन समाज सांगोला तालुका परिश्रम घेत आहेत. तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या स्वागतासाठी तसेच पुतळा उभारणी सोहळ्यासाठी 

सांगोला शहर व तालुक्यातील बौद्ध समाज बंधू भगिनी, भीम अनुयायी, फुले शाहू आंबेडकर प्रेमी, तमाम बहुजन बंधू भगिनी यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments