सांगोला शहरातील सि.स.नं. १७२९ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उर्दु शाळेच्या जागेबाबत सुरू असलेले नगरपरिषदेसमोरील उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित
सांगोला/प्रतिनिधी (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला नगरपरिषमध्ये लोकप्रतिनिधींचे कार्यकाळ संपल्यानंतर सांगोला नगरपरिषदेचे सर्व ताबा प्रशासनाचा हाती गेल्यानंतर या प्रशासनाकडून सांगोला शहरातील कोणत्याही लोकप्रतिनिधींना विचारात न घेता आपल्या मनमर्जीप्रमाणे व चुकीचे काही निर्णय व ठराव
घेवून सि.स.नं. १७२९ ही जागा पूर्वीपासून कायमस्वरूपी मुस्लिम समाजाची उर्दु शाळेची असताना या जागेवरती नगरपरिषदेकडून चुकीचे बांधकामाचे नियोजन करण्यात आलेले होते. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.
याबाबत वारंवार सांगोला नगरपरिषदेला या ठरावामुळे दोन समाजामध्ये दुरावा निर्माण होईल व भविष्यामध्ये हा निर्णय किती धोकादायक देखील ठरू शकतो याबाबत अनेक वेळा लेखी अर्ज देवून तोंडी सूचनाही दिलेल्या होत्या
तरीदेखील नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केलेले होते. त्यानंतर मुस्लिम समाजाला आपले हक्क मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने सांगोला नगरपरिषदेच्या समोर दि. ०५ फेब्रुवारी पासून पुढे बेमुदत उपोषण करण्यात आले.
त्यानंतर या उपोषणास अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील नेते मंडळी, माजी नगरसेवक यांनी उपोषणास आपला जाहीर पाठिंबा दर्शवून कोणावरही अन्याय करण्यात येवू नये अशी मागणी केली होती.
यानंतर आमदार बाबासाहेब देशमुख व मा.आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी या उपोषणस्थळी भेट देवून उपोषणकर्त्यांची मागणी समजून घेवून यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना याबाबत योग्य सूचना देत
कोणावरही अन्याय न करता पूर्वीपासून असलेल्या जागेवर मुस्लिम समाजाला ती जागा उपलब्ध करून देणे व मागणी केलेल्या समाजाला देखील पर्यांयी जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे अश्या सूचना दिल्या
व मुस्लिम समाजावर कसलाही अन्याय होणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर मुस्लिम समाजाने आपले सुरू असलेले उपोषण सांगोला पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक भिमराव खनदाळे यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण तात्पुरते स्थगित केले.
या वेळी हाजी शब्बीरभाई खतीब, कमरूद्दीनभाई खतीब, शफी इनामदार, शौकत खतीब, अस्लम खतीब, मज्जीद खतीब, फिरोज खतीब, कादिर इनामदार, साहिल खतीब, जहुर खतीब, तोहिद मुल्ला,
रफीक तांबोळी, आलमगीर मुल्ला, तौफिक मुजावर, नजीर मुलाणी, सय्यद मुलाणी, रसुल खतीब, आदम मुलाणी, आयाजभाई मणेरी, नुर मणेरी, महेबुब मणेरी, इम्तियाज मणेरी, अल्लाऊद्दीन खतीब, रख्खा शेख,
वजीर खतीब, रफीउल खतीब, हाफीजोद्दीन (बंडू) खतीब, इरफान फारूकी, कमरूद्दीन काझी, मजहर खतीब, जाकीर खतीब, बुध्द भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे बापूसाहेब ठोकळे,
किशोर बनसोडे, अक्षय (दादा) बनसोडे, पत्रकार मिर्जागालीब मुजावर, हमीद बागवान, चाँद शेख, मोहसीन मुलाणी यासोबत मुस्लिम व बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments