google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोला शहरातील शासकीय कार्यालय येणार एकाच छताखाली

Breaking News

मोठी बातमी..सांगोला शहरातील शासकीय कार्यालय येणार एकाच छताखाली

मोठी बातमी..सांगोला शहरातील शासकीय कार्यालय येणार एकाच छताखाली


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शहरातील नगरपालिका सोडून सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली येणार असून त्या प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून 

जुलै 25 पर्यंत पूर्ण होऊन 26 जानेवारी 2026 रोजी सर्व शासकीय कार्यालय ही दिवाणी फौजदारी न्यायालयाजवळ असणार्‍या प्रशासकीय इमारतीत जाणार असून तालुक्यातील नागरिकांची भटकंती थांबणार आहे.

माजी आमदार शहाजीबापु पाटील यांनी तालुक्यातील 50 ते 60 किलोमीटर वरून येणारे शासकीय कामासाठी पुरुष महिला वृद्ध तरुणांची तसेच शेतकर्‍यांची भटकंती थांबावी म्हणून शासनाची सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली यावे 

म्हणून 14 कोटी 79 लाख म्हणजेच 15 कोटीच्या रकमेचे प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी मंजुरी आणली निधी आणला व कामाला सुरुवात केली आज तीन मजले पूर्ण झाले

 असून गिलाव्याचे काम चालू असून जुलै 2025 पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील व त्यानंतर फर्निचर वीज याचे काम बाकी राहील व तेही काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा अधिकारी व ठेकेदार करीत आहे.

सांगोला शहरात तहसील कार्यालयाची इमारत ही ब्रिटिश कालीन आहे तसेच तालुका कृषी कार्यालय हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पंढरी प्रसाद ने भाड्याने घेतलेल्या कार्यालयात पोट भाडे करू म्हणून कृषी कार्यालय आहे 

अक्षरशा जनावराच्या बाजारात सदरचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात सर्वत्र जनावराचे शेण तसेच कडबा व कचरा मोठ्या प्रमाणात आहे 

तालुक्यातील शेतकर्‍यांना बस स्थानकापासून सदर कार्यालयात जायचे म्हटले की सहा किलोमीटर चालावे लागते रिक्षा भाडे शंभर रुपये घेतले जाते एसटीला दहा रुपये भाडे देऊन स्वतःच्या गावापासून तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी येतो 

व शंभर रुपये रिक्षाला भाडे देतो पायी चालत यायचे म्हटले तर 30 ते 45 मिनिटे लागतात . अधिकारी व कर्मचारी कधी भेटत नाहीत व त्यामुळे शेतकर्‍यांना हेलपाटे घालायला लागत होते. शेतकर्‍यांचे दिवसेंदिवस वाया जात होते

 ही शेतकर्‍यांची अवस्था पाहून माजी आमदार शहाजीबापु पाटील यांनी एका छताखाली कार्यालय आणली असून अधिकारी व कर्मचारी आता शेतकर्‍यांना भेटतील अशी अपेक्षा आहे

सदर प्रशासकीय इमारतीत तळमजल्यावर तहसीलदार कक्ष, सभागृह, उपनिबंधक कार्यालय, लोक अदालत विभाग, सेतू विभाग, 

पुरवठा विभाग, उपहारगृह, अभ्यागत कक्ष, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, दिव्यांग व्यक्ती साठी रॅम्प आणि स्वच्छतागृह पोर्च तीन जिने व लिफ्ट असा भाग आहे.

पहिल्या मजल्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, लागवड अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, वैद्यमापन विभाग, गृह रक्षक विभाग, सहयोगी प्राध्यापक विभाग, अभ्यास कक्ष, महिला व पुरुष व दिव्यांग व्यक्ती साठी स्वतंत्र स्वच्छतागृह,

दुसर्‍या मजल्यावर तहसील कार्यालय, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, सहकार विभाग ,आदितोरियम व्हिडिओ कॉन्फरन्स, कॉन्फरन्स रूम, व्हीआयपी कक्ष, अभ्यागत कक्ष, महिला पुरुष व दिव्यांग व्यक्ती साठी स्वतंत्र स्वच्छतागृह असे राहणार आहे 

सदर प्रशासकीय इमारतीच्या बाजू संरक्षक भीत अंतर्गत रस्ते वाहनतळ पार्किंग शेड असणार आहे सदर प्रशासकीय इमारतीच्या बाजूलाच दिवाणी व फौजदारी न्यायालय , वन कार्यालय आहेत.

Post a Comment

0 Comments