ब्रेकिंग न्यूज..सांगोला तालुक्यातील डोंगरगावः गॅस टाकीचा स्फोट,
संसारोपयोगी साहित्यासह घर उध्दवस्त, सुदैवाने जिवितहानी नाही
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील डोंगरराव येथील भारत पंडा चौंडे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होवुन
घरातील संसारोपयोगी वस्तूसह धान्य व इतर जिवनावश्यक वस्तु खाक झाल्या. तसेच घर देखील उध्दवस्त झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणी नसल्याने जिवित हानी झाली
नसुन ही घटना शनिवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गँस टाकीचा स्फोट कशामुळे झाला याचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारत चौंडे हे रात्री घराबाहेर झोपले होते. दरम्यान
रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चौंडे यांच्या घरात अचानक गॅसच्या टाकीचा झाला. हा स्फोट ऐवढा भिषण होता की, परिसरात देखील घबराट पसरली होती.
सिलेंडर स्फोटाच्या तिव्रतेने परिसर हादरून गेला. तर या घटनेत घरातील संसारोपयोगी वस्तूसह धान्य व इतर जिवनावश्यक वस्तु खाक झाल्या असून चौंडे यांचा संसार उघड्यावर आला आहे.
माणुसकीच्या नात्याने भारत चौंडे व कुटुंबाला मदत करण्यासाठी वस्तू, धान्य, कपडे, रोख स्वरूपात मदत करावी, आपल्याला जी मदत करता येईल. ती मदत करावी असे आवाहन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments