ब्रेकिंग न्यूज..प्रहार संघटनेकडून आ. बाबासाहेब देशमुख
यांना विविध मागण्याचे निवेदन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- दिव्यांग बांधवांसाठी राखीव असणारा ५ % निधी व इतर मागण्यांबाबत दिनांक २५ फेब्रुवारी रोजी प्रहार संघटनेकडून आ. बाबासाहेब देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे,
अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नविद पठाण यांनी दिली आहे.
शासकीय नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थामधील स्व:उत्पन्नातील ५ % निधी दिव्यांग बांधवांसाठी कल्याणकारी कामासाठी राखीव ठेवण्यात येतो .
सांगोला नगरपालिकामधील सन २०१९ ते २०२५ या कालावधीतील दिव्यांग निधी , खर्च रक्कम व अनुशेष रक्कम, दिव्यांग भवन आदी विषयांवर मुख्याधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी.
तसेच सांगोला तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत यांच्याकडील सन २०२३ - २४ व २०२४ - २५ मधील दिव्यांग निधीचे उद्दिष्ट , खर्च रक्कम बाबत गटविकास अधिकारी व तहसील कार्यालयातील
दिव्यांग पेन्शन योजना, स्वतंत्र शिधापत्रिका आदी विषयांवर संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन , दिव्यांग बांधवाच्या अडीअडचणी सोडण्याबाबतचे निवेदनात म्हंटले आहे.
0 Comments