शेतकरी ओळखपत्रासाठी पैसे घेतल्यास सीएससी सेंटर अगर सेतू केंद्राची मान्यता रद्द...- मंडल अधिकारी मा. हरिश्चंद्र जाधव
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
ओळखपत्रासाठी शुक्रवारी नाझरा विद्या मंदिर मध्ये कॅम्पचे आयोजन...- अध्यक्ष रविराज शेटे
सांगोला प्रतिनिधी राज्य शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी
प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घेणे गरजेचे आहे व तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली
नोंदणी वाढविण्याचे काम गतीने सुरू आहे व या योजनेत सी एस सी सेंटर, शेतू केंद्र यांनी पैसे घेतल्यास त्यांची मान्यता रद्द करू असा इशारा मंडळ अधिकारी नाझरे हरिश जाधव यांनी दिला आहे.
नाझरे, सरगर वाडी, अनकढाळ, चोपडी, बंडगर वाडी, चिनके, वझरे, यलमार मंगेवाडी, अजनाळे, लिगाडेवाडी, बलवडी इत्यादी गावासाठी शेतकरी ओळखपत्राच्या नोंदणीसाठी कॅम्पचे आयोजन करा
अशी मागणी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटने तर्फे अध्यक्ष रविराज शेटे यांनी केल्याने यासंदर्भात सर्व सेतू केंद्र, सीएससी सेंटर यांची बैठक नाझरे मंडल मध्ये
मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव, तलाठी के. ए. बाडीवाले, रविराज शेटे व सेंटर चे सर्व चालकांची बैठक नाझरे येथे संपन्न झाली व मोफत ओळखपत्र मिळावे व त्यांचे आयोजन करावे अशी मागणी रविराज शेटे यांनी यावेळी केली.
त्यानुसार शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत विद्यामंदिर प्रशाला नाझरे येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याचे तलाठी के .ए.बाडीवाले, यांनी सांगितले.
सदर प्रसंगी शेतकरी सिद्धेश्वर शिंदे, अवधूत सुतार, रामचंद्र कुंभार, ऑनलाइन सेंटरचे चालक नितीन टिंगरे, बालाजी पाल सांडे, सौ. कविता बाबर, विकास आदाटे, निरंजन केंगार, समाधान आदाटे, ओंकार यादव,
शरद कोळवले, उत्तम साठे, ती पण ना खांडेकर, अंकुश अदाटे, देविदास लोखंडे, कोतवाल मच्छिंद्र रणदिवे इत्यादी उपस्थित होते. यावेळी कॅम्पचे आयोजन करा असे निवेदन मंडल अधिकारी हरीश जाधव यांना रविराज शेटे यांनी दिले.
0 Comments