सांगोला, मंगळवेढा, जत हया तीन तालुक्याच्या मध्यभागी असणारे गाव असून अप्रूपा नदीच्या काठी वसलेले गाव घेरडी येथील स्वयंभू महादेव यात्रेस सुरवात
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
प्रतिनिधी (शशिकांत कोळी): घेरडी हे गाव सांगोला, मंगळवेढा, जत हया तीन तालुक्याच्या मध्यभागी असणारे गाव असून अप्रूपा नदीच्या काठी वसलेले गाव असून या गावामध्ये अनेक वर्षा पासून स्वयंभू महादेव मंदिर आहे.
त्याची फार पूर्वी पासून घेरडी येचे यात्रा भरत असून तेथे येणारे भाविक व व्यापारी यांच्या कडून त्यांची माहिती सांगितले जाते हे मंदिर फार पूर्वी पासून असून ते जागृत देवस्थान आहे.त्या स्वयंभु महादेवा चे नाव आम्रेश्वर आहे. आहे.
त्याचे दोन निसम भक्त होते एक जंगली महाराज व दुसरे राजेबाग स्वार असे दोन भक्त होते. हे दररोज नित्त नियमाने त्याची पूजा करत होते. परंतु पूर्वी अनेक मंदिरे नष्ट केली जात होती
या भीती पोटी या दोन निसम भक्तांनी मूर्तीस काही होऊ नये म्हणून ती मुर्ती जमिनीच्या खोल वरती खुणून कोणाकडून त्या मूर्तीला इजा होऊ नये म्हणून जमिनीच्या आत मध्ये मुर्ती पुरून ठेवली होती.
त्या. नंतर अनेक वर्षांनी दादू गेजगे नावाच्या इसम तेथे जनावरे चारण्यासाठी जात होता त्याला एके दिवशी पिण्यासाठी तहान लागली होती म्हूणन तिथे एक जिवंत झरा होता म्हूणन त्याने तिथे त्याला तहान लागली म्हणून तिथे गेला.
थोडे पाणी पिण्यासाठी गेला तो त्या झऱ्या पाशी खणू लागला असता स्वयंमभू महादेवाची मुर्ती थेथे त्याला दिसली व त्याने व त्याच्या साथीदाराने वर काढली व त्याची दररोज नित्त नियमाने पूजा चालू केली.
तेव्हा पासून प्रत्येक वर्षी महाशिवरात्री दिवशी त्याची यात्रा भरते. त्याच्या जवळच काही अंतरावर त्या महादेवाचा भक्त राजेबाग स्वार याचे ठिकाण असून त्याचा ही गंध असतो म्हूणन तोही साजरा गावकरी त्याच्या वतीने साजरा करतात
अशी अख्यायिका आहे. ते जागृत देवस्थान असल्यामुळे महाशिवरात्री दिवशी अनेक लांबून लोक तिथे दर्शनासाठी येत असतात. आजही भरपूर मोठया प्रमाणात तिथे महाशिवरात्री दिवशी तिथे यात्रा भरते.
0 Comments