घरकुल लाभार्थीना मंजुरी आदेश व घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण कार्यक्रम पंचायत समिती सांगोला बचत भवन येथे
आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते ३ हजार २०३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आदेश वाटप
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- घरकुल लाभार्थीना मंजुरी आदेश व घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण कार्यक्रम पंचायत समिती सांगोला बचत भवन येथे आम. डॉ. बाबासाहेब देशमुख,
मा. आम दिपकआबा साळुंखे पाटील व गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला. एकूण ३०० घरकुल लाभाय्यांना मंजूर आदेश वाटप करण्यात आला.
तर सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकाच दिवशी शनिवारी ३ हजार २०३ लाभाय्यांना एका क्लिकवर घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरण कार्यक्रम पार पडला.
यामध्ये पहिला हप्ता वितरण पुणे येथून मा. नामदार अमित शहा केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले
ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉ. राजाराम दिये इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिल्हा तालुका व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर घरकुल लाभार्थीना मंजुरीचे पत्र वितरण कार्यक्रम झाला आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या गृहोत्सावाच्या कार्यक्रम सर्व ग्रामपंचायतचे सरपंच महोदयांच्या अध्यक्षतेखाली
आजी-माजी पदाधिकारी, पालक अधिकारी, पंचायत अधिकारी, संपर्क अधिकारी यांचे उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत मंजूर आदेश
व पहिला हप्ता वितरण करण्यात आला आहे. यावेळी बोलताना आमदार देशमुख यांनी जागेचा प्रश्न घरकुल अनुदान वाढवणे, इत्यादी बाबत लाभार्थीशी चर्चा केली आहे
तसेच गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी पंचायत समिती सांगोला यांच्या सहीचे आदेश वाटप करण्यात आले असून सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायत मध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला. असे त्यांनी सांगितले.
0 Comments