आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा वासुद ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार
व सर्वरोग मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्याचे नूतन नवनिर्वाचित आमदार, हजारो लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे हृदयरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा समस्त वासुद ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य
नागरी सत्कार सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व शाल -श्रीफळ हार, श्री रवींद्र कदम सर लिखित आनंदी जीवनाचे सिक्रेट आनंदवेल हे पुस्तक देऊन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
या सत्काराच्या सोहळ्यासाठी सर्व सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर, सांगोला सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन श्री नानासाहेब लिगाडे,
सांगोला खरेदी-विक्री संघाचे सर्व संचालक, वासुद गावातील माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी मेंबर तसेच शेतकरी कामगार पक्षातील वासुद अकोला गावातील आणि सांगोला तालुक्यातील सर्व नेते मंडळी उपस्थित होते.
तसेच आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प.प्राथ शाळा वासुदगाव, केदारवाडी ,बाबर मळा, सपताळ मळा यामधील शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
व अंगणवाडी मधील सर्व मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मेडिसिन, अस्थिरोग, बालरोग ,स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र, नेत्ररोग ,सर्जरी व मूत्ररोग, फॅमिली फिजिशियन व सर्जन या विभागातील नामवंत डॉक्टर्स यामध्ये डॉ.प्रसाद साळे डॉ.यशोदीप गायकवाड डॉ. एच व्ही गावडे डॉ. राजू जानकर डॉ.बी यु पाटील डॉ. संतोष पाटील डॉ. सुधीर ढोबळे
डॉ. विजय बंडगर डॉ. मेघना देवकते डॉ.स्नेहल भोसले डॉ. अमृता लिगाडे डॉ.दिव्यता केदार डॉ. सुनील लवटे डॉ. विजयसिंह भोसले चंद्रभागा नेत्रालय चे डॉ. तानाजी वाघमोडे व त्यांचा स्टाफ डॉ.निरंजन केदार डॉ. जयंत केदार डॉ. सचिन लिगाडे,
संजीवनी लॅबोरेटरी चे श्री प्रवीण कोळेकर , केदार लॅबोरेटरी चे श्री नितीन बंडगर, प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला वासुद यांचे डॉ संदीप देवकते व सर्व स्टाफ - आशा सेविका यांनी मोफत आरोग्य सेवा दिली.
त्याबद्दल सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते वासुद ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व डॉक्टर्स मंडळींचा येथे सन्मान करण्यात आला.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला वासुद यांचेही सदरच्या शिबिराला विशेष सहकार्य लाभले सदरच्या शिबिराला उदंड प्रतिसाद लाभत ३१८ रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला.
९२ शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली. आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात पार पडले.
0 Comments