google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगोल्यात गुणवंतांचा सत्कार व कवी संमेलनाचे आयोजन....

Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगोल्यात गुणवंतांचा सत्कार व कवी संमेलनाचे आयोजन....

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगोल्यात गुणवंतांचा सत्कार व कवी संमेलनाचे आयोजन....


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)

सांगोला- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सागोला तालुका (अ.प.) वतीने सांगोल्यामध्ये छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा सत्कार व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे

 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आदेशावरून सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्त विविध समाजिक उपक्रम पक्षाच्यावतीने राबविण्यात येत आहेत.

  सांगोल्यात छत्रपती शिवराय जयंतीनिमित्त गुणवंतांचा सत्कार व कवी संमेलन कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ते ॲड. महादेव कांबळे यांनी दिली.दिनांक 16 

फेब्रुवारी रोजी हाॅटेल फाईव्ह स्टार येथे सकाळी 11. वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना व गुणवंतांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन यावेळी सन्मानित करण्यात येईल. 

   छत्रपती शिवरायांचे जीवन कार्य व सामाजिक प्रबोधन कवितेतून व्हावे  या उद्देशाने कवि संमेलन तसेच आपल्या तालुक्यातील विविध क्षेत्रातील विद्यार्थी, तरूण व जेष्ठ व्यक्तींना सन्मानित करावे

 म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते ॲड. महादेव कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments