google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून महिला भगिंनींसाठी सांगोला येथे आज हळदी कुंकू, तिळगुळ वाटप व भव्य न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

Breaking News

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून महिला भगिंनींसाठी सांगोला येथे आज हळदी कुंकू, तिळगुळ वाटप व भव्य न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून महिला भगिंनींसाठी सांगोला येथे


आज हळदी कुंकू, तिळगुळ वाटप व भव्य न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- स्व.आमदार डॉक्टर गणपतरावजी देशमुख विचार मंच आयोजित आमदार डॉ.बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून 

मकर संक्रांत सणानिमित्त आज शनिवार दि.18 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता न्यू इंग्लिश स्कूल पटांगण सांगोला येथे हळदी कुंकू व तिळगुळ वाटप 

कार्यक्रम तसेच न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सौ.निताताई रामचंद्र ढोबळे, सौ.स्वातीताई विजय मगर, सौ. विद्याताई रमेश जाधव यांनी दिली.

यावेळी सांगोला तालुक्यातील लाडक्या बहिणीकडून विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. सत्कार समारंभ कार्यक्रमाचे 

अध्यक्षस्थान शेकापचे युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख हे भूषविणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दिल्ली येथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुमार आवटे व डॉ.संजीवनीताई केळकर उपस्थित राहणार आहेत.

होम मिनिस्टर प्रथम क्रमांक विजेत्या महिलेसाठी स्कूटर, द्वितीय क्रमांकासाठी टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी कुलर, चतुर्थ क्रमांकासाठी

 मिक्सर सेट व पाचव्या क्रमांकासाठी कुकर भेट देण्यात येणार आहे. लकी ड्रॉ मधून विजेत्या महिलांना 25 पैठणी साडीही देण्यात येणार आहेत.

होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर सौ.निकिताताई बाबासाहेब देशमुख, संत सिताराम महाराज साखर का. लि.खर्डीच्या सीईओ डॉ.सौ.राजलक्ष्मी गायकवाड, 

अभिनेत्री श्रुती मधुदीप, कार्यकारी अभियंता सौ.प्रगती पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी हळदीकुंकू व तिळगुळ वाटप यासह न्यू होम मिनिस्टर स्पर्धेत सांगोला तालुक्यातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक सौ.निताताई रामचंद्र ढोबळे, सौ.स्वातीताई विजय मगर, सौ.विद्याताई रमेश जाधव यांनी केलेआहे.

Post a Comment

0 Comments