राज्यस्तरीय पुरस्काराचे पत्रकार चाँदभैय्या शेख यांनी केले शतक पुर्ण ;
पत्रकारिता क्षेत्रातील कोहिनूर हिरा पुन्हा एकदा चमकला
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सामाजिक ,राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात नेहमीच चर्चेत असणारे सांगोला तालुक्यातील पारे गावचे सुपुत्र निर्भीड पत्रकार व सीबीएस न्युज मराठी चे मुख्य संपादक चाँदभैय्या शेख यांनी राज्यस्तरीय पुरस्काराचे शतक पुर्ण केले आहे .
आतापर्यंत १८ वर्षाच्या कालावधीत विविध क्षेत्रातील तब्बल ९९ पुरस्कार प्राप्त केले असून काल महाराष्ट्र फांऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा पत्रकारिता क्षेत्रातील महाराष्ट्र योध्दा दर्पणरत्न हा जाहीर झाल्याने शंभराव्या पुरस्कारांची मोहर उमटली आहे .
अतिशय उदार, सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी दिवस रात्र झटणारे ,दानशुर, संवेदनशील, लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत असणारे चाँदभैय्या शेख यांनी २००२ साली सामाजिक क्षेत्रात
व २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले.विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत हजारो सामाजिक कामे केले आहेत
विशेषतः आपल्या निर्भीड बातम्यांच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे .२०१० साली प्रथम पुरस्कार कैलासवासी कर्मयोगी आमदार गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते
स्विकारल्यानंतर आज २०२५ पर्यंत सुमारे १०० पुरस्काराची चाँदभैय्या शेख यांनी शंभरावी पार केली आहे .त्यांच्या या दमदार कामगिरी मुळे सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे .
चाँंदभैय्या शेख म्हणजे निर्भीड पत्रकार सिंघम पत्रकार हे समीकरण जोडले गेले आहे .विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्भीडपणे काम केल्याने तब्बल ७० संस्थेच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले होते .
पत्रकार चाँदभैय्या शेख यांच्या बातमी ची दखल शासन दरबारी कोणत्याही परिस्थिती घेतली जातेच . चाँदभैय्या च्या निर्भिड लेखणी मुळे सीबीएस न्यूज मराठी डिजिटल नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रभर अग्रेसर म्हणून प्रसिद्ध आहे.
अनेक राजकारणी, समाजविघातक प्रवृत्ती अवैध धंदे यांची दादागिरी चाँदभैया पूर्वीपासूनच आपल्या धारदार लेखणी च्या बळावर मोडीत काढली होती. विशेषतः महाराष्ट्र फाऊंडेशन चा जाहीर झालेला राज्यस्तरीय महाराष्ट्र योध्दा दर्पणरत्न
पुरस्काराचे वितरण आज दिनांक 19 जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पवित्र आळंदी भूमीत होणार आहे .पुरस्कार जाहीर होताच सर्व स्तरावरुन चाँदभैय्या शेख यांच्या वर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे .
0 Comments