google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोल्याहुन कोल्हापूरकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसला लागली आग! प्रवासी बचावले, मोठा अनर्थ टळला

Breaking News

खळबळजनक..सांगोल्याहुन कोल्हापूरकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसला लागली आग! प्रवासी बचावले, मोठा अनर्थ टळला

खळबळजनक..सांगोल्याहुन कोल्हापूरकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसला लागली आग!


प्रवासी बचावले, मोठा अनर्थ टळला

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- सध्या अनेक प्रकारांमध्ये वाढ होत आहे. म्हणजेच खून, मारामारी, अपघात या प्रमाणात वाढ होत असतानाच आग लागण्याचे प्रकार देखील खूपच वाढत आहेत. 

चक्क धावत्या एसटी बसला आग लागली आहे. कोल्हापूर आगाराची एसटी बस कोल्हापूरकडे निघाली असता शेतकरी सहकारी सूत गिरणीसमोर अचानक बॅटरी ब्लास्ट झाल्याने यसला आग लागली.

 परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे अस बाजूला घेतली. सूतगिरणीचा पाण्याचा टैंकर बोलावून आग विझवण्यात आली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास सांगोला -मिरज रोडवरील शेतकरी  सहकारी सूतगिरणी समोर घडली आहे. 

कोल्हापूर आगाराची सोलापूर-कोल्हापूर बस (एमएच १४–बीटी ३५५२) सांगोला बस स्थानकावरून सायंकाळी सात वाजता ७१ प्रवासी घेऊन कोल्हापूरकडे निघाली होती.

दरम्यान एसटी बस सूत गिरणीसमोरून जात असताना अचानक धावत्या एसटी बसची बॅटरी ब्लास्ट झाली. 

त्यामुळे ठिणग्या उडून बसला आग लागून धूर निघू लागला. त्यामुळे प्रवासी घाबरून ओरडू लागले. एसटी चालक सोनवणे यांनी प्रसंगावधान राखून एसटी बस रस्त्याच्या बाजूला घेतली व दरवाजा उघडून

 प्रवाशांना खाली उतरवायला लावले. तसेच सुरवातीला आग प्रतिबंधक सिलिंडरने आग विझविण्याचा प्रयत्न केला कोणीतरी समोरच असलेल्या सूतगिरणीचा पाण्याचा टँकर बोलावला. त्यानंतर पाणी मारून आग आटोक्यात आणली. 

एसटी चालकाने बॅटरी ब्लास्ट झाल्यानंतर एसटी बस रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे बाजूला घेतली व चालक सोनवणे व वाहक तेली यांनी प्रवाशांना दरवाजा उघडून बाहेर पडण्यास सांगितले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Post a Comment

0 Comments