खळबळजनक...'शेकाप'त फूट! जयंत पाटलांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पुतण्या अन् भाचा भाजपच्या वाटेवर
रायगड : राज्यात एकच आमदार असलेल्या शेतकरी कामगार पक्ष ( शेकाप ) फुटीच्या उंबरठ्यावर आहे. 'शेकाप'चे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पुतण्या आणि भाचा भाजपच्या मार्गावर आहेत.
'शेकाप'च्या माजी जिल्हा चिटणीस आणि मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आस्वाद पाटील, माजी आमदार सुभाष पाटील यांचे चिरंजीव सवाई पाटील यांच्यासह अनेक मोठे नेते येत्या काही दिवसांत भाजपमध्ये दाखल होऊ शकतात.
मोजके काही जिल्हे आणि तालुक्यांपुरते राहिलेल्या 'शेकाप'समोर अडचणी कमी होताना दिसत नाहीत. याला जयंत पाटील कारणीभूत असल्याचं बोललं जात आहेत. खरेतर मीनाक्षी पाटील यांच्या निधानानंतर कुटुंबातील वाद विकोपाला गेल्याचं कळतंय.
ऑगस्ट 2024 मध्ये पंढरपूर येथील 'शेकाप'च्या अधिवेशनात जयंत पाटील आणि त्यांचे बंधू माजी आमदार सुभाष उर्फ पंडीत पाटील यांनी पक्षातील मनमानी कारभाराबद्दल पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली.
वाल्मिकअण्णाच्या कुटुंबीयांनी केलेल्या 'त्या' दाव्यानंतर धसांचं उत्तर; म्हणाले, कराडशी माझे चांगले संबंध होते, पण…
रायगड जिल्ह्यात 'शेकाप'चा धुव्वा…
यासह सुभाष पाटील यांनी विधानसभेला अलिबागमधून उमेदवारी मागितली होती. 'मला उमेदवारी देत नसाल, तर आस्वाद पाटील यांना द्यावी,' अशी मागणी सुभाष पाटील यांनी केली होती. मात्र, जयंत पाटील यांनी
अलिबागमधून सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला. शेकापच्या चारही उमेदवारांना रायगड जिल्ह्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले.
कुटुंब चित्रलेखा पाटलांच्या प्रचारापासून दूर…
माजी आमदार सुभाष पाटील, आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ आणि बांधकाम सभापती चित्रा पाटील
निवडणूक प्रचारापासून दूर राहिल्या. त्यामुळे शेकापच्या बालेकिल्ल्यात चित्रलेखा पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची साथ मिळूनही चित्रलेखा पाटील यांचा शिवसेना शिंदे गटाच्या महेंद्र दळवी यांनी जवळपास तीस हजारांनी मतांनी पराभव केला.
विरोधी पक्षात राहण्यापेक्षा सत्तेत राहणे महत्त्वाचे…
विधानसभा निवडणूक होताच आस्वाद पाटील यांनी जिल्हा चिटणीस तसेच 'शेकाप'च्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत पक्षाला 'रामराम' ठोकला.
राजीनामा दिल्यानंतर आस्वाद पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. विरोधी पक्षात राहण्यापेक्षा सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे,
अशी भूमिका आस्वाद पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना पटवून सांगितली. त्यामुळे शेकापचे माजी आमदार आणि भाजपचे खासदार धैर्यशील पाटील यांच्यामागे आस्वाद पाटील हेही भाजपच्या मार्गावर आहेत.
अलिबागमध्ये प्रवेश?
अलीकडेच शिर्डीत भाजपचे महाअधिवेशन झाले. तिथेच आस्वाद पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह पक्षप्रवेश करतील, असं बोललं जात होते. परंतु, आपला पक्षप्रवेश अलिबागमध्ये व्हावा,
अशी इच्छा आस्वाद पाटील यांनी भाजपकडे व्यक्ते केली. त्यामुळे लवकरच आस्वाद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं भाजपमध्ये 'वेलकम' होऊ शकते.
रवींद्र चव्हाणांचे लावले बॅनर…
माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदावर वर्णी लागली आहे. त्यानंतर आस्वाद पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते.
त्याचसोबत आस्वाद पाटील यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चव्हाण यांचे अभिनंदन केले होते.
0 Comments