google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने सात वर्षांच्या मुलीला सोडले नामदेव पायरीजवळ; आई-वडील झाले पसार

Breaking News

धक्कादायक! पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने सात वर्षांच्या मुलीला सोडले नामदेव पायरीजवळ; आई-वडील झाले पसार

धक्कादायक! पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने सात वर्षांच्या मुलीला सोडले नामदेव पायरीजवळ; आई-वडील झाले पसार


एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिचे पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने तिला तिच्या पालकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथील नामदेव पायरीसमोर सोडून गेले.

ही घटना ५ डिसेंबर २०२४ रोजी घडली आहे.

मंदिर सुरक्षा कर्मचारी श्रीधर अशोक कुलकर्णी यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील नामदेव पायरीसमोर एक अनोळखी मुलगी वय अंदाजे 7 वर्ष मिळून आल्याने त्यांनी तीस पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे हजर केले होते.

पोलिसांनी मंदिर परिसरात त्या बालिकेच्या नातेवाइकांबद्दल विचारपूस केली; परंतु कोणीही काहीही माहिती सांगितली नाही. 

त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण समितीच्या अध्यक्षा कोकरे व सय्यद यांना फोनद्वारे अनोळखी मुलीची माहीती दिली.

त्यांच्या सूचनेने पोलिसांनी अनोळखी मुलीस पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रम येथे जमा केले. त्या मुलीस सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बालकल्याण समिती सोलापूर यांच्या समक्ष दाखल केले. 

त्यानंतर तिचे आई-वडील व नातेवाईक यांचा पंढरपूर शहरात शोध घेतला असता तिचे आई-वडील व नातेवाईक अद्यापर्यंत मिळून आलेले नाहीत.

अनोळखी मुलगी वय ७ हिला तिचे पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथील नामदेव पायरीसमोर कोणीतरी अज्ञात पालक सोडून गेलेले आहेत, अशी फिर्याद शहर पोलिस ठाण्यात पोहेकों स्वाती लोंढे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments