google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कार्याध्यक्षपदी ग्रंथमिञ गुलाबराव पाटील बिनविरोध सांगोला - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कार्याध्यक्षपदी

Breaking News

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कार्याध्यक्षपदी ग्रंथमिञ गुलाबराव पाटील बिनविरोध सांगोला - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कार्याध्यक्षपदी

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कार्याध्यक्षपदी ग्रंथमिञ गुलाबराव पाटील बिनविरोध  सांगोला -


महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कार्याध्यक्षपदी

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 ग्रंथमिञ गुलाबराव पाटील (सांगोला सोलापूर) याची तर प्रमुखकार्यवाहपदी ग्रंथमिञ सोपानराव पवार (पुणे) तर कोषाध्यक्षपदी भीमराव पाटील (कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड झाली .

पुणे येथे शिक्षक भवन येथे पार पडलेल्या पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या बैठकीमध्ये या निवडी पार पडल्या .विभागाचे अध्यक्ष विजय कोलते यांचे हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार सन्मान करण्यात आला

 यावेळी ग्रंथमिञ कुंडलिक मोरे ,ग्रंथमिञ जयंत आराध्ये ग्रंथमिञ विजयकुमार पवार ,साहेबराव शिंदे विनोद गायकवाड व विभागातील प्रत्येक जिल्हातील प्रतिनिधी उपस्थित होते

 स्वागत ग्रंथमिञ रमेश सुतार सूञसंचालन हनुमंत देवकर यांनी केले राजू ढमाले यांनी आभार मानले .सार्थ निवड झालेले ग्रंथालय चळवळीतील कणखर नेतृत्व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे मा.अध्यक्ष ग्रंथमिञ गुलाबराव पाटील गेली

 पंचवीस ते तीस वर्ष ग्रंथालय चळवळीसी तन मन धनाने जोडलेला एक कार्यकर्ता म्हणून ओळख आहे घरातील प्रतिकूल परिस्थितीत येणार्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळेपर्यत धडपडणे हा त्यांचा स्वभाव ज्या समाजामध्ये आपण राहतो 

त्या समाजासाठी आपण काहीतरी देण लागतो या भावनेतून गुरुजीनी ग्रंथालय क्षेञातील समर्या अडचणी सोडविण्यासाठी विविध व्यावसायिक संघटनांचे सदस्यत्व स्वीकारले आहे 

मौजे आलेगांव आपल्यागावी सर्वप्रथम स्वामी विद्यानंद वाचनालयाची स्थापना करुन आपल्या ग्रंथालय चळवळीत कामास सुरुवात केली काम करणेचे कसब अप्रतिम असणारे न थांबता अविरत कार्याची गोडी निर्माण करीत

 तद्नंतर सांगोला तालुका ग्रंथालय संघाची स्थापना केली चळवळीत अग्रेसर होत सोलापूर जिल्हा संचालक ,तीन टर्म प्रमुखकार्यवाह ,तीन टर्म अध्यक्ष ,पुणे विभाग प्रमुखकार्यवाह         

,उपाध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ संचालक विविध पदावर कार्यरत राहून सामाजिक आर्थिक सहकार शिक्षण ग्रंथालय अशा विविध क्षेञात अविरत ठसा उमटविलेले कार्यपाहून   सन 2010 ते 2011 साली 

महाराष्ट्र शासनाकडून ग्रंथमिञ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली ..नेहमी पद यांची वाट पाहते  त्या म्हणीप्रमाणे त्यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली आहे ..

Post a Comment

0 Comments