google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वनपरिक्षेत्र सांगोला (प्रा) मालकी क्षेत्रात मोठी कारवाई विनापरवाना वाहतुक ट्रक क्र.MH 45 0180 कडूलिंब जळावु लाकुड मालासह जप्त सांगोला वनविभागाकडून आणखी एक मोठी कारवाई

Breaking News

वनपरिक्षेत्र सांगोला (प्रा) मालकी क्षेत्रात मोठी कारवाई विनापरवाना वाहतुक ट्रक क्र.MH 45 0180 कडूलिंब जळावु लाकुड मालासह जप्त सांगोला वनविभागाकडून आणखी एक मोठी कारवाई

वनपरिक्षेत्र सांगोला (प्रा) मालकी क्षेत्रात मोठी कारवाई विनापरवाना वाहतुक ट्रक क्र.MH 45 0180 कडूलिंब जळावु लाकुड

मालासह जप्त सांगोला वनविभागाकडून आणखी एक मोठी कारवाई

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, वनपाल सांगोला व वनरक्षक सांगोला यांनी सांगोला ते मिरज रोड येथे रात्रीची फिरती करत असताना दि.28.01.2025 रोजी सदरचा ट्रक क्र. MH 45 0180 विनापरवाना कडूलिंब जळावू लाकुड वाहतूक करत असताना जप्त केला.

सांगोला ते मिरज रोड येथे फिरती करत असताना दि.28.01.2025 रोजी रात्री 01.30 वा. फिरती करत असताना ट्रक क्र.MH 45 0180 मध्ये कडूलिंब जळावू लाकुड 22.638 घ.मी दिसुन आले. 

वाहन चालक यांचेकडे वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक पास परवाना नसल्याचे दिसुन आले. 

पंचनामा, जबाब, कागदपत्रे केली. जप्त लाकूड मालाचे अंदाजे 10 टन व किंमत अंदाजे 30,000/- होईल. 1) अनिल श्रीशेल बिराजदार रा. शिरठोन ता. चडचण जि. विजापूर (वाहन चालक) 2) राजु लक्ष्मण सोलकर रा. कात्राळ 

ता. मंगळवेढा जि. सोलापूर (ट्रक-मालक) 3) बिराप्पा लक्ष्मण सोनलकर रा. शिरठोन ता. चडचण जि. विजापूर (लाकुड-व्यापारी) 4) माळाप्पा लक्ष्मण माने रा. कात्राळ ता. मंगळवेढा जि. सोलापूर 

(शेतकरी) यांनी विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक केले बद्दल लाकुड मालासह वाहन जप्त केले. या चार व्यक्तीवर वनरक्षक सांगोला यांनी प्रथम वनगुन्हा क्र.ओ-02/2025 दि.28.01.2025 यानुसार

 वनगुन्हा नोंद केला आहे. विनापरवाना वृक्षतोड करणे व विनापरवाना वाहतूक करणे आरोपी यांना वनगुन्हा मान्य आहे. त्यामुळे कारवाई केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला करित आहेत.

वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी. वनविभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी.

 अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे.

 प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे. ज्या झाडापासुन धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा. प्रत्येक माणसाला झाडापासुन एका दिवसाला 15 कि. यॉ. ऑक्सीजन लागतो.

 ज्या झाडाची गोलाई साधारण 6 ते 7 फुट आहे अशी झाडे सात असल्यास एका माणसाला 15 कि.ग्रॉ. ऑक्सीजन मिळतो असे पर्यावरण तज यांचे मत आहे. झाडे आहेत 

म्हणून आपण आहोत याची जाणिव कोरोना (कोव्हीड-19) च्या काळात आपल्याला माहिती झाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा. 

तसेच सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. वृक्षतोड बंद करून व जास्तीत जास्त वृक्षलागवड करून 

सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त मुक्त करता येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. 

वनक्षेत्रात किंवा मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा मोबाईल नंबर 9420378279 वर संपर्क साधावा. असे आव्हान केले आहे.

सदरची कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे लेफन्टंट कुशाग्र पाठक व मा. सहा वनसंरक्षक (कॅम्पा), सोलापूर करण्यात आली. सदरची कारवाई तुकाराम विठ्ठल जाधवर सांगोला, वनरक्षक सांगोला जी.बी. व्हरकटे यांनी केली.

 एन. आर. प्रवीण, मा. उपवनसंरक्षक, सोलापूर व्ही. एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला व जे.जे. खाँदे वनपाल

संपर्क 9420378279

Post a Comment

0 Comments