google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार..सांगोल्याहून हैदराबादकडे जाणारी ही एसटीनेमोहोळ बसस्थानकात घेतला अचानक पेट; कोणतीही जिवीतहानी नाही

Breaking News

धक्कादायक प्रकार..सांगोल्याहून हैदराबादकडे जाणारी ही एसटीनेमोहोळ बसस्थानकात घेतला अचानक पेट; कोणतीही जिवीतहानी नाही

 धक्कादायक प्रकार..सांगोल्याहून हैदराबादकडे जाणारी ही एसटीने 


मोहोळ बसस्थानकात घेतला अचानक पेट; कोणतीही जिवीतहानी नाही

महोळ : मोहोळ बसस्थानकात सांगोला डेपोची बस ( क्रंमाक एम एच -११ बीएल ९४५१ ) सांगोला - हैदराबाद गाडी एकूण ६९ (मोठे), (लहान )४ प्रवासी असे एकूण ७३ प्रवासीसह थांबली होती.

 बसच्या इंजीनने अचानक पेट घेतल्याने लागलेल्या आगीत बसच्या इंजीनसह चालक केबिन पुर्णपणे जळुन भस्मसात झाली.

सुदैवाने चालक व वाहकांच्या प्रसंगावधामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.ही आग सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानाने व अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाडीच्या प्रयत्नाने विझवण्यात आली.

या बाबत माहिती अशी की, सांगोला डेपोची बस क्रमांक एम.एच . -११ बीएल ९४५१ ही सांगोल्याहून हैदराबादकडे जाणारी ही एसटी सकाळी साधारणतः बाराच्या सुमारास मोहोळ बस स्थानकावर येऊन थांबली होती. 

बसचालक सुनिल विलास काशीद यांना बसच्या इंजिनमध्ये अचानक धुर निघून आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ त्यांनी वाहक विजय बबन बंडगे यांना कल्पना दिली. 

प्रसंगावधान राखून दोघांनी तात्काळ बसमधील प्रवाशांना साहित्यासह खाली उतरायला सांगितले.तोपर्यंत बसच्या इंजिनने चांगलाच पेट घेतला होता.आगीने उग्र स्वरूप धारण केले होते.

मोहोळ येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, वाहतुक नियत्रक ,एस टी कर्मचारी,वाहतुक पोलीस यांच्या अथक प्रयत्नामुळे सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले.

यात कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी झाली नाही.अचानक झालेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे बसस्थानकाच्या बाहेर इतर बसेस व वाहनांसह बघ्याची मोठी गर्दी झाली होती. 

बसमधील प्रवाशांनी व उपस्थितांनी चालक, वाहक व सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांच्या विशेष प्रसंगावधानाचे समाधान व्यक्त केले.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चंदू गोडसे, जिब्राईल शेख,सोमनाथ पवार,शैलेश स्वामी,बिलाल शेख,पिण्याचे पाणी आपल्या 

वाहनाने घरोघरी पुरविणारे शुभम शेटे,एस टीचे स्थानिक कर्मचारी तानाजी गायकवाड,बबलु देसाई,वाहतुक नियंत्रक दादा उन्हाळे,पोलीस वाहतुक 

व्यवस्थेचे संजय नेमाजी, महादेव रोडे,लोकनेते साखर कारखाना अनगर अग्निशामक दलाच्या गाडीसह आदीनी विशेष प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. बस स्थानकावरील बस सेवा सुरळीत सुरू झाली.

सुनिल विलास काशीद बसचालक, (सांगोला- हैदराबाद बस )"बसस्थानकात बसची नोंद करण्यासाठी गेलो होतो.नोंद करुन येताना मला बसच्या इंजिनामध्ये धुर येत असल्याचे व थोडी आग लागल्याचे लक्षात आले.

मी तात्काळ वाहक विजय बंडगे याला मोठ्याने ओरडुन सांगितले.आम्ही दोघांनी बसमधील प्रवाशांना ओरडुन खाली उतरण्याच्या सुचना केल्या.सर्व प्रवासी साहित्यासह सुखरूप खाली उतरविले.

ही आग इंजिनमधील वायरच्या शॉर्टसक्रीटमुळे लागली असावी.प्रमोद डोके , माजी नगरसेवक ,मोहोळ.एसटी बसमधून प्रवाश्यांना विविध योजना राबविण्यात येत असल्याने बसमधून प्रवास करणारांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे एसटी महामंडळास चांगले उत्पन्न मिळत आहे.मात्र बहुतांश वेळा कोणत्या ना कोणत्या बिघाडामुळे लालपरी थांबलेली असते. काही बसची अवस्था अत्यंत वाईट असते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

अनेक वर्षांच्या जून्या गाड्या रस्त्यावर धावत आहेत.त्या जून्या खिळखिळ्या गाड्या स्क्रॅपला देऊन नवीन गाड्या उपलब्ध करून प्रवाशांचा त्रास कमी करून एसटीचा प्रवास सुखाचा करावा."

Post a Comment

0 Comments