google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..स्टेट बँक ऑफ इंडिया कोळे येथील ए.टी.एम "असून अडचण नसून खोळंबा" ; नागरिकांमधून तीव्र नाराजी.

Breaking News

खळबळजनक..स्टेट बँक ऑफ इंडिया कोळे येथील ए.टी.एम "असून अडचण नसून खोळंबा" ; नागरिकांमधून तीव्र नाराजी.

खळबळजनक..स्टेट बँक ऑफ इंडिया कोळे येथील ए.टी.एम "असून अडचण नसून खोळंबा" ; नागरिकांमधून तीव्र नाराजी.


कोळे प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून कोळे ता.सांगोला येथील भारतीय स्टेट बँकेचे ए.टी.एम मशीन बंद अवस्थेत आहे. त्याचबरोबर जवळच असलेल्या HiTachi कंपनीचे SBI चे 


आणखी एक ए.टी.एम असूनही गेली आठ दिवसांन पासून कॅश नसल्या कारणास्तव तेही बंद अवस्थेत आहे. कोळेसह इतर ग्रामीण भागातील व पंच क्रोशितील गावांमधील नागरिकांना 

याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.कोळे मधील मोठी व्यापारी वसाहत आहे व मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी होत असते.यामध्ये प्रामुख्याने कापड दुकानदार,मोठ मोठी मॉल , किराणे दुकानंदार ,

 हॉस्पिटल आहेत,या ठिकाणी कोळेसह इतर ग्रामीण भागातील लोक वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येत असतात.यामुळे सर्वसामान्य जनतेला पैश्याची अडचण भासत असते परंतु व्यवहार करण्यासाठीं

 बँकेच्या खातेवरीली ऑनलाईन स्वरुपात विविध माध्यमांचा वापर करून फोन पे,गूगल पे वरून रक्कम देण्याकरिता वापर केला जात असतो. त्या मध्ये बँकिग काहीतरी अडचण आली असता.  

सर्व सामान्य नागरीकांना जवळील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोळे येथील बँकेच्या ए टी एम मध्ये जातात व त्या ठिकाणी असलेले एटीएम मशीन बंद अवस्थेत असलेल्या दिसून येतात.सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे

 लागते.संबंधित बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून सदरचे एटीएम मशीन तात्काळ सुरू करून सर्व सामान्य जनतेस होत असलेला नाहक त्रास नाहिसा करावा व तेथील

 असलेले स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोळे येथील ए टी एम हे लवकरात लवकर सुरू करावे असे जनतेमधून जोरदार चर्चा होत आहे. त्यातच बँकेमधून भरपूर प्रमाणात गर्दीही असतेच परंतु आज अखेर जर एटीएम मशीन सुरू असते

 तर लोक झटपट मशीन पैसे काढून आपल्या पुढील कामकाजासाठी अथवा दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी जात असतात.एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यव्हार करण्याचे आवाहन केले 

तर दुसरीकडे बँकांमधून सुविधा मिळत नसल्याने कॅशलेस व्यवहाराचे घोडे अडले आहे. सर्वसामान्य जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु कधी तांत्रीक अडचणींमुळे, कधी पैशाअभावी हे केंद्र बंद राहात आहे.

Post a Comment

0 Comments