google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि शिक्षण विभाग यांना निवेदन

Breaking News

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि शिक्षण विभाग यांना निवेदन

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा



सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि शिक्षण विभाग  यांना निवेदन

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला जिल्हा सोलापूर - 22 जानेवारी ( वार्ता.) -  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा  या मागणीचे निवेदन सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने  तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि गटशिक्षणाधिकारी शिक्षण विभाग

यांना मंगळवार, 22 जानेवारी या दिवशी देण्यात आले. निवेदन देतेवेळी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने  श्रीकांत देशपांडे, डॉक्टर मानस कमलापूरकर, नवनाथ कावळे, चेतन बुरंगे, दत्तात्रय शिंदे, विजयकुमार इंगोले, अजय रोडगे, 

विकास चन्ने, भीमाराम चौधरी, सुखानंद हळीसागर सर, एन बी पवार, गणपत पटेल, दीपक केदार, संतोष पाटणे सर, श्रेयश तोडकरी आदी उपस्थित होते. या निवेदनात पुढे म्हटले आहे की,

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात

 मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. 

त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका क्रमांक 103/2011 दाखल करण्यात आली होती

 यावर न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अन राज्य गृह विभाग तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रक ही काढले आहे

 याच समवेत केंद्र शासनाने ही प्लास्टिक बंदी चा निर्णय घेतल्याने त्यानुसार ही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणे हे कायदाविरोधी आहे यंदा दुकानातून तसेच ऑनलाइन पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील मास्क, टी-शर्ट आणि अन्य उत्पादनाची विक्री होत 

असल्याचे आढळून आले आहेत अशोक चक्रासह तिरंग्याचा मास्क व अन्य उत्पादने बनवणे आणि वापरणे हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे असे करणे हे राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर

 रोखणे कायदा 1950 कलम 2 व 5 नुसार तसेच राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 नुसार आणि बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध ) अधिनियम 1950 या तिन्ही कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे.  *या संदर्भात आमच्या खालील मागणी आहेत* 

1. शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी या समितीमध्ये हिंदू जनजागृती समिती यथाशक्ती योगदान देऊन या विषयावर जनजागृती करण्यासाठी आपल्याला साहाय्य करेल. 

2. जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन व विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी. 

3. शाळांतून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा हा उपक्रम राबवण्यासाठी तसेच समितीने या विषयावर जागृती करण्यासाठी बनवलेले विशेष ध्वनी चित्रफित विविध केबल वाहिन्याद्वारे चित्रपटगृहे यात दाखवण्याविषयी अनुमती पत्र मिळावे ही विनंती.

Post a Comment

0 Comments